जिल्हा
परिषद सिंधुदूर्ग या कार्यालया कडील सर्व पत्रव्यवहार व इतर कार्यालयीन
कामे संगणकावर
करणेसाठी खालील प्रमाणे स्वॉप्टवेअर व ऑपरेटिंग सिस्टीमचा वापर
करण्यात येत आहे.
युनिक्स
सिस्टीमवर जिल्हा परिषदेकडील वेतन देयके तयार केली जातात. त्याचप्रमाणे
आवर्त ठेव चे गोषवारे, न वटलेल्या चेकची यादी इत्यादी कामे युनिक्स
सिस्टीमवर केली जातात.
लिनक्स
सिस्टीम व्दारे जिल्हा परिषदे कडील कर्मचारी यंाचे भविष्य निर्वाह
निधीचे वार्षिक तक्ते तयार केले जातात.
- विंडोस
एक्स.पी. व विस्टा -
विडोसं
एक्स.पी. व विस्टा ही ऑपरेटिंग सिस्टीम वापरुन जिल्हा परिषदेकडील
दररोजचे कार्यालयीन कामे संगणकावर केली जातात. या मध्ये साधारणत:
जिल्हा परिषदेकडील रोजचा
पत्रव्यवहार तसेच शासनास वेळोवळी पाठविले जाणारे अहवाल इत्यादींची
कामे या ऑपरेटींग सिस्टी व्दारे केली जातात.
लॅन
-
जिल्हा परिषद, सिंधुदूर्ग कडील सर्व विभाग लॅन ने जोडणेत आलेले आहेत.
इंटरनेट
-
जिल्हा परिषदेमध्ये साधारणत: सर्व विभागामध्ये इंटरनेट सुविधा सुरु करणेत आलेली
आहे. आपल्या जिल्हा परिषदेमध्ये मा. जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी यंाचे मार्फत
वित्त विभाग संगणक कक्ष ,मा. अध्यक्ष , मा.मुख्य कार्यकारी अधिकारी , मा. अति.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनामध्ये इंटरनेट सुविधा सुरु आहे.
तसेच जिल्हा परिषदेकडील जवळ जवळ सर्व विभागामध्ये बी.एस.एन.एल. ब्रॉडबॅड इंटरनेट
सुविधा सुरु आहे.
|