|
 |
|
 |
  |
|
|
जिल्हा ग्रागीण विकास यंत्रणा |
| |
- स्वर्णजयंती
ग्राम स्वरोजगार योजना -
स्वरूप
दारिद्र्य निर्मूलनासाठी असलेल्या सर्व
योजनांचा आढावा घेऊन सर्व परिस्थितीचा विचार करून, पूर्वीच्या
सर्व योजना रद्द करून गरीब जनतेचे उत्पन्न वाढविण्यासाठी स्वर्णजयंती
ग्राम स्वरोजगार योजना नावाची परिपूर्ण योजना 1 एप्रिल 1999 पासून
संपूर्ण देशात सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये स्वरोजगार
निर्मितीसाठी गरीब कुटूंबाना एकत्रित आणून त्यांना स्वरोजगाराची
संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण, मुलभूत सुविधा, पतपुरवठा,
तंत्रज्ञान, बाजारपेठ अशा सर्व आवश्यक गरजांचा पूर्ण विचार केलेला
आहे. या योजनेमध्ये स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेतलेला आहे. या
योजनेचा लाभ घेणा-या व्यक्तीनां स्वरोजगारी या नांवाने संबोधण्यात
येते. ही योजना व्यवसायावर आधारीत आहे. ग्रामीण भागातील छोटया-छोटया
व्यवसायात व्यवसायात/उद्योगात गुंतलेल्या ग्रामीण कारागिरांना
स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे तसेच ग्रामीण उद्योगाना प्राधान्य
देणे हे एक या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
उद्देश
दारिद्रय रेषेखालील कुटूंबांना तीन वर्षात
बँक कर्ज व शासकीय अनुदान यांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी
लागणा-या सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून देऊन कुटूंबांचे प्रतिमहा
कर्जाच्या हप्त्याची रक्कम वजा जाता निव्वळ उत्पन्न रु.2000/-
पर्यंत आणणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. यासाठी पाच वर्षाच्या
कालावधीत प्रत्येक तालुक्यातील 30 टक्के कुटूंबाना दारिद्रय रेषेच्या
वर आणण्याचा संकल्प आहे.
योजनेची वैशिष्ट्ये
1. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात छोटे-छोटे
उद्योग स्थापन करून ग्रामीण गरीब जनतेची क्षमता वाढविणे व गरीब
जनतेत विश्वास निर्माण करून त्यांना योग्य ती मदत दिल्यास ग्रामीण
गरीब यशस्वी उत्पादक होऊ शकतो हे सिध्द करणे.
2. ग्रामीण भागात दारिद्रय रेषेखालील कुटूंबांचे
स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन करून गटामार्फत स्वयंरोजगार निर्मिती
करणे. बँक व पंचायत समिती/ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमार्फत स्वरोजगारी/स्वयंसहाय्या
गट निवड झाल्यानंतर फक्त स्वयंसहाय्यता गटांना खेळते भांडवल पुरविणे,
कौशल्यवृध्दी प्रशिक्षण घेतल्यानंतर बँकेकडे व्यवसायासाठी कर्जप्रस्ताव
पाठविणे. योजनेमध्ये अनु.जाती/जमातीला 50%, महिला 20% आणि अपंगाना
3% लाभ दिला जातो. या योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील
परितक्त्या/विधवा महिलांना प्राधान्याने लाभ देण्यात यावा असेही
निर्देश आहेत.
3. मदत दिलेल्या कुटूंबाना तीन वर्षात दारिद्रय
रेषेच्या वर आणणे.
4. तालुकास्तरावर प्रमुख व्यवसायाची निवड
करून या व्यवसायासाठी कुटूंबाना आर्थिक मदत देणे, जेणेकरून त्याला
तीन वर्षात प्रतिमहा रु.2000/- निव्वळ उत्पन्न मिळवून देणे.
5. निवडक व्यवसायासाठी समूह (Cluster) पध्दतीचा
अवलंब करणे.
6. 30 टक्के कुटूंबांना 5 वर्षात दारिद्रय
रेषेच्या वर आणणे.
7. वैयक्तिक स्वरोजगारीनां सर्वसाधारण 30%
रु.7500/- पर्यंत मर्यादेत व अनु.जाती/जमातींसाठी 50% रु.10,000/-
पर्यंत मर्यादेत अनुदान देय आहे.
8. सामुहिक उपक्रमासाठी प्रकल्प किंमतीच्या
50% व जास्तीत जास्त रु.1.25 लाख अनुदान मिळते.
9. या योजनेमध्ये अनुसूचित जाती/जमातीसाठी
50%, महिलांसाठी 40% व अपंगांसाठी 3% लाभ द्यावयाचा आहे.
10. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये जिल्हा
परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती यांचा अंतर्भाव केलेला
आहे.
11. मदत दिलेल्या व्यक्तीला स्वरोजगारी
म्हणून संबोधण्यात येते.
12. मदत दिलेल्या गटानां/वैयक्तिक स्वरोजगारीनां
आपला व्यवसाय करता यावा यादृष्टीने मुलभूत अंतर्गत सुविधा निर्माण
करून देण्यात येतात.
13. ग्रामीण भागातील कौशल्याला वाव मिळवून
देणे.
14. स्वरोजगारीने निवडलेल्या व्यवसायाबाबत
प्रशिक्षण देणे.
15. निर्माण केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून
देणे.
16. या योजनेमध्ये कर्जाची मर्यादा नाही.
वारंवार कर्ज देण्याची सोय आहे.
17. स्वरोजगारी निवडीमध्ये पारदर्शकता,
निवड प्रक्रियेमध्ये सरपंच, गट विकास अधिकारी, बँकेचे प्रतिनिधी
यांचा समावेश आहे.
18. कर्ज परतफेड नियमितपणे करणे आवश्यक.
19. कर्जफेड 80 टक्क्यापेक्षा कमी असल्यास
ते गांव/ग्रामपंचायत/पंचायत समिती या योजनेच्या लाभापासून वंचित
होईल.
स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत
दारिद्रय रेषेखालील कुटूंबांचे बचत गट स्थापन करण्यावर विशेष
भर देण्यांत आलेला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची सुरूवात दा.रे.
कुटूंबातील सदस्यांचे स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन करण्यापासून
होते.
(1) स्वयंसहाय्यता बचत गट:-
निश्चीत स्वरूपाचे सामुहिक उद्दिष्ट ठरवून
स्वत: सहाय्यभूत ठरणारा समान सामाजीक, आर्थिक पार्श्वभूमी असलेल्या
समान विचारणसरणीचा एकत्रित झालेला लोकांचा समूह म्हणजेच बचत गट
होय.
बचत गटाची रचना व कार्यपध्दती
1 किमान 10 व कमाल 20 व्यक्तींचा बचत गट
असावा.
2 समान विचारसरणी, समान सामाजिक व आर्थिक स्थिती असलेल्या व्यक्ती
गटाचे सदस्य असावेत.
3 बचत करण्याची सवय असावी.
4 सर्व सदस्य दारिद्रय रेषेखालील कुटूंबातील असावेत.
5 गटाने स्वत:चे बचतीच्या स्वरुपात भांडवल तयार करावे.
6 बँकेत खाते उघडावे.
7 उत्पन्न वाढविणारा व्यवसाय निवडावा.
8 गटाने आपली आचारसंहिता / नियमावली तयार करावी.
9 सर्वानुमते निर्णय घ्यावेत.
10 गटाच्या नियमीत बैठका घ्याव्यात.
11 गटाने आपला पत्रव्यवहार व हिशेब ठेवावेत.
12 बचत गटाने बँकेत बचत गटाच्या नांवाने खाते उघडावे.
13 गटाने जमा केलेली रक्कम सदस्यांना त्यांच्या गरजांनूसार नाममात्र
व्याजाने द्यावयाची आहे.
14 गट स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये स्वयंसेवी संस्थांचा सहभाग
केलेला आहे.
15 स्वयंसेवी संस्थंाना प्रति गटामागे रु.10,000 मानधन देण्यात
येते.
पहिले श्रेणीकरण (ग्रेडेशन)
या बचत गटानी गट स्थापन केल्यापासून कशा
पध्दतीने काम केलेले आहे त्याचे श्रेणीकरण सहा महिन्यानंतर करण्यात
येते. या श्रेणीकरण प्रक्रियेमध्ये गट विकास अधिकारी आणि बँक
व्यवस्थापक यांचा समावेश असतो. ग्रेडेशन केल्यानंतर ज्या गटाचा
कारभार योग्यप्रकारे चाललेला आहे त्याची गुणवत्ता ठरवून ज्यांना
70 टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत अशा गटानां रु.25,000
पत मर्यादा बँकेकडून मंजूर केली जाते. यापैकी रु.10,000 अनुदान
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून व रु. 15,000 कर्ज स्वरूपात
बँकेकडून मंजूर केले जाते.
दुसरे श्रेणीकरण (ग्रेडेशन)
बचत गटाने आपली बचत व फिरता निधी या दोन्ही
प्रकारचा निधी याचा वापर त्या गटाचे भांडवल म्हणून करावयाचा आहे.
या निधीचा वापर योग्यप्रकारे करण्यात येऊन गट कार्यान्विंत आहे
की नाही याची तपासणी करणेसाठी गट विकास अधिकारी व बँक व्यवस्थापक
यांचेमार्फत दुसरे ग्रेडेशन केले जाते. या ग्रेडेशनमध्ये जर त्या
गटाची कार्यपध्दती योग्य असेल, या तपासणीमध्ये किमान 70 टक्के
गुण मिळालेले असतील तर स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत
कर्जप्रस्ताव तयार करण्यात येतो.
दारिद्र्य रेषेखालील कुटूंबास तीन वर्षात
कर्ज व अनुदान यांचे माध्यमातून सर्व मुलभूत सुविधा उपलब्ध करून
तिस-या वर्षापासून दरमहा रु.2000/- उत्पन्न मिळावे अशी अपेक्षा
आहे.
1) प्रशिक्षण
1. मुलभूत प्रशिक्षण
2. कौशल्यावर आधारीत प्रशिक्षण
2) जास्तीत जास्त कर्ज पुरवठा बचत गटांमार्फत
3) 75% निधी प्रमुख व्यवसायावर व 25% निधी इतर व्यवसायांवर
4) लाभार्थीना स्वरोजगारी म्हणून ओळखले जाते.
5) स्वरोजगारीची निवड करण्यासाठी सरपंच, गट विकास अधिकारी किंवा
प्रतिनिधी व बँक यांची समिती आहे.
6) बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.
7) अपंग व्यक्तीनां 3 टक्के प्राधान्य.
|
|
- इंदिरा
आवास योजना (नवीन घरकुले) -
ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील ज्या व्यक्तीला स्वत:चे
घर नाही अशा व्यक्तीनां घरे बांधण्यासाठी या योजनेतून अनुदान
दिले जाते. या केंद्र
पुरस्कृत योजनेसाठी केंद्र शासन 75 टक्के व राज्य शासन
25 टक्के या प्रमाणांत निधी मिळतो. याशिवाय राज्य शासनाकडून
प्रति घरकुल रु.8,500/- याप्रमाणे अतिरिक्त निधी दिला जातो.
या योजनेंतर्गत अनुदान देताना लाभार्थीची दोन भागात विभागणी
करण्यात आलेली आहे.
- अनुसूचित जाती/जमातींसाठी 60
टक्के
- इतरांसाठी 40 टक्के
खालील बाबीनां प्राधान्य-
अ) सन 2002 च्या जनगणनेनूसार गांवनिहाय इंदिरा आवास घरकुलांसाठी
कायम
प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली असून त्यास
ग्रामसभेची मान्यता घेऊन
प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीतील लाभार्थीना
इंदिरा आवास घरकुलांचा
लाभ दिला जातो.
ब) 40 टक्के इतरांसाठी असलेल्या अनुदानातून
माजी सैनिक किंवा त्यांच्या विधवाना सध्याची
उत्पन्नाची
मर्यादा विचारात न घेता प्राधान्य द्यावयाचे
आहे.
क) या योजनेंतर्गत 3 टक्के अपंग लाभार्थीना
प्राधान्याने लाभ द्यावयाचा आहे.
ड) वेठबिगार लाभार्थीना या योजनेंतर्गत प्राधान्य
द्यावयाचे आहे.
इ) विकास प्रकल्पामुळे बाधीत झालेल्या प्रकल्पग्रस्त
लाभार्थीनां प्राधान्य. या
योजनेंतर्गत प्रतिघरकुल देय्य अनुदान खालील प्रमाणे आहे.
| केंद्र
शासनाकडील निधी (75 टक्के) |
रु. 26,250.00 |
| राज्य
शासनाकडील निधी (25 टक्के) |
रु. 08,750.00 |
| राज्य
शासनाचा अतिरिक्त निधी |
रु. 08,500.00 |
| लाभार्थीचा
हिस्सा |
रु. 01,500.00 |
| प्रति
घरकुल एकूण |
रु. 45,000.00 |
लाभार्थीची
निवड ग्रामसभेमार्फत केली जाते.
घरकुलाचे आकारमान 20 चौ.मी. असावे. घरकुलास शौचालय, सुधारीत
चूल, पाणी, विद्युत इत्यादि मुलभूत सुविधा पुरविणेत येतात. |
|
- राजीव गांधी ग्रामीण
निवारा योजना क्र.1
योजनेचे स्वरुप
राज्यातील ग्रामीण भागातील दारिद्रय
रेषेखालील कुटूंबांकरीता राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना
क्र.1 अंतर्गत प्रत्येकी रु.28500/- इतक्या खर्चाची 200 चौ.फु.
क्षेत्रफळाची घरकुले बांधण्याचा कार्यक्रम 2 वर्षाकरीता राबविण्यात
येत आहे.
योजनेचे निकष
राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना
क्र.1 चे लाभ मिळण्यासाठी संबंधित कुटूंबाचे योजनेच्या लाभक्षेत्रात
वास्तव्य असणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेऊन इच्छिणा-यानी
पूर्वी इंदिरा आवास योजना, प्रधानमंत्री ग्रामोदय योजनावा तत्सम
इतर योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
या योजनेंतर्गत लाभार्थ्याची निवड करताना अनुसूचित जाती/जमातीच्या कुटूंबांना
व अपंग व्यक्तींना केंद्र शासनाने इंदिरा आवास योजनेसाठी निर्धारित केलेल्या प्रमाणांत
लाभ देण्यात यावा. तसेच लाभार्थांपैकी प्रकल्पग्रस्त, अपंग व्यक्ती व स्त्री प्रमुख
असलेल्या कुटूंबांना प्राधान्य देण्यात येते.
योजनेची अंमलबजावणी
ज्या गावात इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
निवडण्याचे काम चालू आहे, अशा गावात लाभार्थी निवडण्यासाठी
दारिद्रय रेषेखालील कुटूंबांच्या सर्वेक्षणाच्या ज्या यादीचा
वापर करण्यात येत आहे तीच यादी या याेजनेतील लाभार्थी निवडीसाठी
वापरण्यात येते.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने निश्चीत केलेल्या घरकुलांचे उद्दिष्ट पंचायत समितीना
व पंचायत समिती मार्फत ग्रामपंचायतीना सूचित करण्यात येते. या योजनेसाठी प्राप्त
झालेल्या उद्दिष्टानूसार अनु.जाती/जमाती व अपंग व्यक्तीनां इंदिरा आवास योजनेमध्ये
देण्यात येणा-या प्राथम्यानूसार ग्रामसभेमार्फत पात्र लाभार्थ्याची निवड करणेत
येते. घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून अनुदानाचे
वाटप पुढील टप्प्यानूसार अग्रीम स्वरूपात करण्यात येते.
| घरकुलाचे
बांधकामास मंजूरी मिळाल्यानंतर |
एकूण रकमेच्या 20 टक्के |
| जोत्यापर्यंतचे
बांधकाम पूर्ण झाल्यानंतर |
एकूण रकमेच्या 20 टक्के |
| छपरी
पर्यन्तचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर |
एकूण रकमेच्या 30 टक्के |
| छतापर्यंत
बांधकाम पूर्ण झाल्यानंतर |
एकूण रकमेच्या 30 टक्के |
घरकुलाचे बांधकाम सुरु झाल्यापासून
ते 3 महिन्यापासून पूर्ण करणे लाभधारकांवर बंधनकारक राहील. |
|
- राजीव गांधी ग्रामीण
निवारा योजना भाग क्र.2
राज्यातील ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील
कुटूंबांसाठी इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुल बांधण्यासाठी अनुदान
दिले जाते. मार्च 2008 पर्यंत इंदिरा आवास योजनेंतर्गत केंद्र
व राज्य शासनाकडून मिळून रु.28,500/- इतके अनुदान दिले जात होते.
मात्र 1 एप्रिल 2008 पासून केंद्र शासनाने व राज्य शासनाने या
अनुदानात वाढ केलेली असून आता इंदिरा आवास योजनेंतर्गत रु.28,500/-
ऎवजी रु.43,500/- एवढे अनुदान दिले जाते. रु.43,500/- अनुदान
व रु.1,500/- मजूरीच्या स्वरुपात लाभार्थी हिस्सा असा मिळून लाभार्थ्याने
किमान रु.45,000/- एवढया किंमतीचे घरकुल बांधणे आवश्यक आहे.
इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्रय रेषेखालील कुटूंबांचे सर्वेक्षण 2002 च्या यादीतील
बेघर कुटूंबांना लाभ देण्यात येतो. याच धर्तीवर राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या
दिनांक 29 नोव्हेंबर 2005 च्या शासन निर्णयानूसार राज्यात राजीव गांधी ग्रामीण
निवारा योजना भाग क्र.1 व राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना भाग क्र.2 अशा दोन
नवीन योजना सुरु करण्यात आल्या. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना भाग क्र.1 व
इंदिरा आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा दारिद्रय रेषेखालील असणे ही प्रमुख
अट आहे. मात्र दारिद्रय रेषेच्या लगत वरती असणा-या आर्थिकदृष्टया दुर्बल अनेक
कुटूंबाना या दोन्ही योजनांतर्गत लाभ घेता येत नाही. तसेच स्वत:च्या अल्प उत्पन्नामुळे
त्यांना स्वत:चे पक्के घर बांधता येत नाही. अशा कुटूंबांना स्वत:चे घर बांधण्यासाठी
प्रोत्साहित करण्यासाठी राजीव गांधी ग्रामीण निवास योजना क्र.2 राबविण्याचा निर्णय
राज्य शासनाने घेतला आहे.
या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेवरील मात्र अल्प उत्पन्न गटातील
कुटूंबाकरीता प्रत्येकी रुपये एक लाख खर्चाची 1,25,000 घरकुले येत्या दोन वर्षात
बांधण्यात येणार आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थ्यास रु.90,000/- बीनव्याजी कर्ज
बँकांमार्फत देण्यात येईल व लाभार्थीचे स्वत:चे रु.10,000/- असे मिळून रुपये एक
लाख किंमतीचे घर बांधणे आवश्यक आहे. रु.90,000/- कर्जाची उचल केल्यापासून एक वर्षानंतर
कर्जाच्या परतफेडीच्या हप्त्यास सुरुवात होईल व सदरचे कर्ज 10 वर्षात परतफेड करावयाची
आहे. कर्ज परतफेडीचा मासिक हप्ता रु.833/- एवढा असेल. याशिवाय कर्जदार लाभार्थीस
10 वर्षाच्या कालावधीसाठी बँकेकडून विमा संरक्षण दिले जाईल व त्यासाठी लाभार्थ्यास
रु.3000/- रक्कम बँकेकडे भरावी लागेल. लाभार्थ्याची इच्छा असल्यास ही रक्कम सुध्दा
त्यास बँकेकडून अतिरिक्त कर्ज म्हणून मंजूर केली जाते. जर लाभार्थीने अतिरिक्त
रु.3000/- कर्ज स्वरुपात घेतल्यास त्यासाठी त्याला रु.833/- ऐवजी रु.861/- एवढा
मासिक हप्ता भरावा लागेल. कर्जाच्या परतफेडीच्या हमीपोटी लाभार्थ्याने बांधलेले
घरकुल त्याखालील जमिनीसह बँकेकडे तारण ठेवावे लागेल.
सदरचे कर्ज हे लाभार्थ्यास बिनव्याजी कर्ज असल्यामुळे कर्जावरील व्याज राज्य शासन
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) मार्फत भरणार आहे. लाभार्थ्याने
किमान 269 चौ.फु. चटई क्षेत्राचे घरकुल स्वत: बांधावयाचे आहे. लाभार्थी कुटूंबांचे
वार्षिक उत्पन्न रु.96,000/- पेक्षा जास्त नसावे. वार्षिक उत्पन्न रु.96,000/-
पेक्षा जास्त नसल्याबाबत तहसिलदार किंवा तहसिलदार यांचेपेक्षा वरिष्ठ महसूल अधिका-यांचा
दाखला जोडावा. विहीत ज्ञ्नमून्यातील अर्ज कागदपत्रांसह लाभार्थ्याने ग्रामपंचायतीकडे
सादर करावा. ग्रामपंचायतीने सदरचा अर्ज ग्रामसभेपुढे ठेवून त्यास ग्रामसभेची मान्यता
घेऊन तो अर्ज पंचायत समितीकडे सादर करावा. पंचायत समिती सदरचा अर्ज जिल्हा ग्रामीण
विकास यंत्रणेकडे सादर करील. जि.ग्रा.वि. यंत्रणा असा अर्ज प्राप्त झाल्यानंतर
15 दिवसांचे आत संबंधित अर्जदारास बोलावून त्याला जिल्हा अग्रणी बँकेने सुचविलेल्या
बँकेत स्वत:च्या नावे बचत खाते उघडून त्यामध्ये रु.10,000/-ची रक्कम जमा करण्याबाबत
मार्गदर्शन करील व सदरचा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी संबंधित बँक शाखेकडे पाठविण्यात
येईल.
या योजनेंतर्गत कर्ज मागणीसाठी प्राप्त होणा-या अर्जावरील प्रशासकीय कारवाईसाठी
कोणत्याही प्रकारची प्रक्रिया शुल्क बँक आकारणार नाही. तसेच महसूल अधिका-याने
घरकुलाची जमीन बोजाविरहीत असल्याबाबतचा दाखला दिला असल्यास अशा प्रकरणात शोध अहवाल
फी (सर्च रिपोर्ट फी) बँकांनी घेऊ नये अशा शासनाच्या सूचना आहेत. बँक कर्ज प्रकरण
मंजूर केल्यानंतर कर्जाची रक्कम दोन सुलभ हप्त्यात म्हणजे रु.40,000/- चा पहिला
हप्ता व रु.50,000/-चा दुसरा हप्ता लाभार्थीस उपलब्ध करून देईल. कर्जाचा पहिला
हप्ता प्राप्त झाल्यानंतर त्या रकमेचा विनियोग योग्य कामासाठी झाल्याबाबतचे उपयोगिता
प्रमाणपत्र कनिष्ठ अभियंता पेक्षा कमी नसलेल्या दर्जाच्या अधिका-याने द्यावयाचे
आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यानां त्यांच्याकडे घरकुल बांधण्यासाठी स्वत:ची
जागा नसल्यास, उपलब्धतेनूसार गावठाणाच्या, ग्रामपंचायतीच्या किंवा शासनाच्या जमिनीतून
घरकुलासाठी 750 चौ.फु. क्षेत्रफळाचा भुखंड विनामुल्य मंजूर करण्याची जबाबदारी
शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सोपविलेली आहे.
योजनेंतर्गत लाभार्थीने स्वत:चे घरकुल स्वत: बांधावयाचे असून त्यामध्ये किमान
एक बहुउद्देशीय खोली, न्हाणीघर, व शौचालयाचा समावेश असावा. घरकुलाचे बांधकाम
कर्जाचा पहिला हप्ता प्राप्त झाल्यापासून तीन महिन्यांत पूर्ण करणे संबंधीत
लाभार्थीवर
बंधनकारक राहील. सदरची योजना राबविण्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा
ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हयातील सर्व बँका, जिल्हा अग्रणी बँक, जिल्हाधिकारी
कार्यालय
व महाराष्ट्र गृहानिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) यांचेवर
वेगवेगळी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
|
| |
|
- एकात्मिक पडीक
जमीन विकास कार्यक्रम-
केंद्र शासनाकडील भुसंसाधन विभागामार्फत
या जिल्हयातील पहिल्या टप्प्यात खाली दर्शविलेले तीन प्रकल्प
मंजुर करून कार्यान्वीत करण्यात आलेल्या प्रकल्पांची प्रमुख उद्दिष्टे
खालील प्रमाणे आहेत :-
1. पडीक जमिनीवर वनकुरण, माती व आर्द्रता यांचे संधारण करणे.
2. उत्कृष्ट पीक व्यवस्थापनेच्या तंत्रद्वारे कृषियोग्य जमिनी
सुधारणा करणे.
3. कायम उत्पादनासाठी जमीन व पाणी या साधनसंपत्तीची व्यवस्था
कायम राखणे.
पाणलोट निवडीचे निकष :-
1. पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई असलेले पाणलोट क्षेत्र
2. अनु. जाती / जमातीची बरीच लोकसंख्या असलेले पाणलोट क्षेत्र.
3. व्यापक पडीक जमीन असलेले पाणलोट क्षेत्र.
4. व्यापक सर्वसाधारण जमीनीचे असलेले पाणलोट क्षेत्र.
5. किमान मजूरीपेक्षा वास्तविक मजूरी ब-याच प्रमाणात कमी असलेले पाणलोट क्षेत्र.
6. इतर विकसीत पाणलोट क्षेत्राच्या लगतच्या पाणलोट क्षेत्रास प्राधान्य.
7.सरासरी 500.00 हे. आकारमानाचे क्षेत्र.
|
अ.
क्र.
|
बाब
|
प्रकल्प -I
कुडाळ - कणकवली
|
प्रकल्प -II
कणकवली - वैभववाडी
|
प्रकल्प -III
सांवतवाडी
|
1 |
प्रकल्प मुल्य
|
रु 453.00 लाख
|
रु 471.00 लाख
|
रु 713.16 लाख |
2 |
मंजूरीची तारीख
|
28 ऑगस्ट 1998
|
1 डिसेंबर 1999
|
21 मार्च 2001 |
3 |
प्रकल्पातंर्गत येणारी गांवे
|
कुडाळ - भरणी, गवळगांव, कुपवडे, भुतवड, जांभवडे, घोडगे, सोनवडे, घाडीगांव, दुर्गानगर
कणकवली - कळसुली, राजनगर, उपनगर, लिंगेश्वर नगर, पिंपळेश्वर नगर, उल्हासनगर श्रीनगर,
उत्तमनगर, पिंपळगांव, नरडवे, जांभळगांव, भैरवगांव, यवतेश्वर |
कणकवली - चिंचंवली वेंर्ले, शेर्पे, खारेपाटण, बंदरगांव, वायंगणी, संभाजीनगर, नडगिवे,
वारगांव, साळीस्ते, शिडवणे, कुरंगवणे, कांजिर्डे
वैभववाडी - सरदारवडी, नाधवडे, खांबलवाडी, सोनाळी, पिंपळगांव,
नापणे, बांधवाडी.
|
सांगेली, कलबिस्त शिरशिंगे, ओवळीये, पारपोली, वेर्ले, सावरवाड
|
4 |
पाणलोट संख्या
|
16
|
17
|
21 |
5 |
एकूण क्षेत्र (हे.)
|
11320.00
|
11775.00
|
11886.00 |
6 |
कार्यान्वीत यंत्रणा
|
उपसंचालक व
सहा. संचालक
सा. वनी. सिंधुदुर्ग |
सहा. संचालक
सा. वनी. सिंधुदूर्ग व
उपसंचालक
सा. वनी. सिंधुदुर्ग |
जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी , सिंधुदूर्ग उपविभाग कृषि अधिकारी , सांवतवाडी |
7 |
एकूण उपलब्ध निधी
|
रु 444.16 लाख
|
रु 417.96 लाख
|
रु 317.52 लाख |
8 |
मार्च 2008 अखेर खर्च
|
रु 437.55 लाख
|
रु 409.93 लाख
|
रु 209.48 लाख |
9 |
मार्च 2009 अखेर खर्च
|
रु 437.55 लाख
|
रु 409.93 लाख
|
रु 218.63लाख |
1)
कुडाळ - कणकवली -
कुडाळ - कणकवली प्रकल्प पुर्ण झालेला असून प्रकल्पाचे अंतिम मुल्यांकन मातृमंदिर,
देवरुख, रत्नागिरी या संस्थेमार्फत करणेत आलेले आहे. संस्थेचा अंतिम अहवाल प्राप्त
झाला असून प्रकल्प समाप्तीबाबतचा अंतरिम प्रस्ताव मा. सचिव जलसंधारण, ग्राम विकास
व जलसंधारण विभाग यांचेकडे दि.4/9/2007 रोजी सादर करणेत आलेला आहे. प्रकल्पांतर्गत
जिल्हास्तरावरील, प्रकल्प कार्यान्वयीन अभिकरण व पाणलोट समिती स्तरावरील बँक खाती
पुर्णपणे बंद करून उर्वरीत निधी केंद्र शासन खाती जमा करुन अंतिम अहवाल केंद्र शासनास
सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.केद्र शासनाकडून यशदा,पुणे या संस्थेमार्फत कुडाळ-कणकवली
प्रकल्पाचे मुल्यमापन नुकतेच दि.19 मे ते 23 मे 2009 या कालावधीत पूर्ण करण्यात
आले आहे.
2) कणकवली - वैभववाडी -
कणकवली - वैभववाडी प्रकल्पाची अंतिम मुदत मार्च 2007 मध्ये संपलेली असून प्रकल्पांतर्गत
सातवा तथा शेवटचा हप्ता मागणी प्रस्ताव सर्व त्रुटींचे पुर्ततेसह मंजूरीसाठी केंद्र
शासनाकडे या कार्यालयाचे पत्र क्र.3992 दि.31/03/2009 अन्वये सादर करणेत आलेला आहे.प्रकल्पाचे
सन 2007-08 चे लेखा परिक्षण पुर्ण करुन घेण्यात आले असून केंद्र शासनाने उपस्थित
केलेल्या सर्व त्रुटींचे निराकरण करण्यात आले आहे.अदयाप केंद्र शासनाकडून सातवा
हप्ता वितरीत केलेला नाही.यासाठी या कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे. 3) सावंतवाडी -
सावंतवाडी प्रकल्पाची मुदत डिसेंबर 2010 पर्यंत वाढवीलेली असून प्रकल्पांतर्गत
आतापर्यंत तीन हप्ते प्राप्त झालेले आहेत. प्रकल्पांतर्गत प्राप्त तिस-या हप्त्याचा
निधी सदर प्रकल्पांतर्गत अंतर्भुत असलेल्या पाणलोट विकास संघाना त्यांच्या मागणी
प्रस्तावानुसार जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे शिफारशीने वर्ग करणेत आलेला
आहे.प्र.का.अ.यांनी सादर केलेल्या प्रकल्पाच्या विचलन प्रस्तावास तांत्रिक मान्यता
घेणेसाठी सहसंचालक ,सामाजिक वनिकरण वृत्त कोकण यांचे अध्यक्षतेखाली तांत्रिक
समितीची सभा दि.20/05/2009 रोजी आयोजित केली आहे.
|
|
केंद्र शासनाकडील भुसंसाधन विभागामार्फत
या जिल्हयातील पहिल्या टप्प्यात खाली दर्शविलेले तीन प्रकल्प
मंजुर करून कार्यान्वीत करण्यात आले.या प्रकल्पांची प्रमुख
उद्दिष्टे खालील प्रमाणे आहेत :-
-
ग्रामीण
लोकांना सातत्य पूर्ण उत्पन्नाचे साधन निर्माण करणे.
-
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणेकरीता पावसाच्या पाण्याचा
प्रत्येक थेंब न थेंब वाचविणे.
-
रोजगार निर्मिती व दारीद्र्य निर्मुलन.
-
नैसर्गिक साधन सामुग्रीचा संवर्धन व विकास, पर्यावरणाचा
समतोल राखणे.
-
ग्रामीण क्षेत्राचा ग्रामपंचायत मार्फत सर्वांगिण विकास.
-
सोप्या परवडण्यायोग्य, वापरण्यायोग्य तंत्राचा वापर वाढविणे.
-
वातावरणातील बदलावर मात करणे.
-
मजूर, रक्कम, साधा सामुग्री इ. द्वारे लोकांचा सहभाग.
-
पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या.
-
अनु. जाती / जमाती लोकसंख्या पाणलोटावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे ते क्षेत्र.
-
पडीक जमीनी, अति धूपीच्या जमीनी असलेल्या पाणलोट क्षेत्रास प्राधान्य
-
सामुदायिक जमिनी अधिक असलेल्या क्षेत्रास प्राधान्य
-
प्रत्यक्षात दिली जाणारी मजूरी ही कमीत कमी असणा-या मजूरीपेक्षाही
कमी आहे असे पाणलोट क्षेत्र.
-
इतर विकसीत पाणलोट क्षेत्राच्या लगतच्या पाणलोट क्षेत्रास प्राधान्य.
-
सरासरी 500.00 हे. आकारमानाचे क्षेत्र.
-
500.00 हे. क्षेत्रात 2 ते 3 गांवे येत असतील याची लघू पाणलोटात विभागणी
|
अ.
क्र.
|
बाब
|
प्रकल्प -IV देवगड
|
प्रकल्प -V कणकवली
|
प्रकल्प -VI मालवण
|
1
|
प्रकल्प
मुल्य
|
रु 300.00 लाख
|
रु 300.00 लाख
|
रु 300.00 लाख
|
2
|
मंजूरीची
तारीख
|
18/7/2006
|
18/7/2006
|
18/7/2006
|
3
|
प्रकल्पातंर्गत
येणारी गांवे
|
10
|
8
|
8
|
पोंबुर्ले,
धालावल, कोर्ले, उंडिल, पाटगांव, बुरबांवडे, नाद, गवाणे,
शिरवली, ओंबळ |
कलमट, आसिये, सातरल, कासरल, तरंदळे, पिसेकामते, वरवडे, वागदे |
गोळवण, डिकवल, कुमामे, चाफेखोल, नागार, हेदुळ, खोटले, वायंगवडे |
4
|
पाणलोट
संख्या
|
9
|
8
|
8
|
5
|
एकूण
क्षेत्र (हे.)
|
5000.00 हे.
|
5000.00 हे.
|
5000.00 हे.
|
6
|
कार्यान्वीत
यंत्रणा
|
गट विकास अधिकारी, पं.स. देवगड
|
गट विकास अधिकारी, पं.स.
कणकवली
|
गट विकास अधिकारी, पं.स.
मालवण
|
7
|
एकूण
उपलब्ध निधी
|
रु 47.00 लाख
|
रु 47.00 लाख
|
रु 47.00 लाख
|
8
|
मार्च
2008 अखेर खर्च
|
रू. 1.57 लाख
|
रू. 1.15 लाख
|
रू. 1.23 लाख
|
9
|
मार्च
2009 अखेर खर्च
|
रू. 24.45 लाख
|
रू. 25.72 लाख
|
रू. 33.00 लाख
|
हरियाली - 2003 मार्गदर्शक सुचनांनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मालवण, कणकवली
व देवगड या तीन तालुक्यांसाठी प्रकल्प मंजूर झाले असून तीन्ही
प्रकल्पांतर्गत आतापर्यत एकूण सर्व 26च्या 26 गावांचे प्रकल्प
आराखडे यांना जिल्हा तांत्रिक सल्लागार समिती व जिल्हा पाणलोट
समितीची मान्यता घेण्यात आलेली आहे. तसेच आराखड्याप्रमाणे
फळबाग लागवड ,वनिकरण लागवड ,पौष्टीक फळबाग रोपांचे वाटप ,गांडुळ
खत उत्पादन युनिट स्थापन करणे ,परसबाग रोपांचे वाटप ,गांडुळ
खत वाटप ,जलशोषक चर इत्यादी कामांना सुरूवात करणेत आलेली
आहे.
तीन्ही प्रकल्पांतर्गत दुस-या हप्त्याचे प्रस्ताव 23 डिसेंबर 2008 रोजी केंद्र
शासनाकडे सादर करणेत आले आहेत. दरम्यान तीन्ही प्रस्तावांवर केंद्र शासनाकडून
त्रुटी उपस्थित करण्यात आल्या.सदर त्रुटींचा पुर्तता अहवाल केंद्र शासनास सादर
करणेत आला असून प्रकल्प मालवण व कणकवलीसाठी केंद्र व राज्य हिस्सा वितरीत करणेत
आला आहे.सदर निधी प्रकल्पातील पाणलोट विकास समितींना वर्ग करणेची कार्यवाही
पूर्ण झाली आहे. देवगड प्रकल्पाचा केंद्र हिस्सा प्राप्त करून घेण्यासाठी पाठपुरवठा
सुरू आहे. मात्र राज्य हिस्सा प्राप्त असून त्याचे वाटप पाणलोट समित्यांना करण्यात
आले आहे.तसेच तीन्ही प्रकल्पांचे भौतिक साध्य कमी असल्याने प्रकल्प कार्यान्वयीन
अभिकरणची जबाबदारी सामाजिक वनिकरण विभागाकडून काढून संबंधित तालुक्यांचे गट
विकास अधिकारी ,पंचायत समिती (देवगड,कणकवली,मालवण) यांचेकडे सोपिवणेत आली आहे.
|
|
| |
|
 |
 |
 |
|
|