|
 |
|
 |
  |
|
| ग्रामपंचायत
विभाग |
| |
| सिंधुदुर्ग
जिल्हा परिषदेमध्ये 08 तालुके असून त्या अंतर्गत 430 ग्रामपंचायती
आहेत.सदर
430 ग्रामपंचायतीचे प्रशासन चालविण्याकरीता ग्रामसेवकांची एकूण
310 पदे मंजुर असून 303 ग्रामसेवक सद्यस्थितीत कार्यरत आहेत.तसेच
ग्राम
विकास अधिकारी यांची 65 पदे मंजुर असून 57 ग्राम विकास अधिकारी
कार्यरत आहेत.विस्तार अधिकारी (पंचायत) यांची 22 पदे मंजुर असून
22 विस्तार अधिकारी (पंचायत) कार्यरत आहेत.शासन आदेशानुसार उपरोक्त
ज्या संवर्गाची रिक्त पदे आहेत.सदर पदे भरणेबाबतची कार्यवाही सुरु
आहे. |
| |
| ग्रामपंचायत विभागातंर्गत
राबविण्यात येणा-या योजना खालीलप्रमाणे- |
| |
- जिल्हा ग्राम
विकास निधी कर्ज -
मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 133 नुसार प्रत्येक
जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा ग्राम विकास निधी गठीत केलेला
आहे.मुंबई ग्राम विकास निधी नियम 1960 नुसार
प्रत्येक ग्रामपंचायतीने तीच्या मागील वित्तिय वर्षातील उत्पन्नाचे 0.25% रक्कम
अंशदान म्हणून प्राप्त झालेल्या निधीतून पंचायतीना अधिनियमातील अनुसूची एक मध्ये
निर्दिष्ट केलेली विकास कामे पार पाडण्यासाठी ग्रामपंचायतीनी विद्यमान आर्थिकस्थिती
व कर्ज फेडीची क्षमता विचारात घेऊन अंदाजपत्रकीय रकमेच्या 75 % प्रमाणे कर्ज
मंजूर करण्यात येते.ग्रामपंचायतीकडून प्राप्त झालेल्या कर्ज
प्रस्तावाची छाननी केलेवर
कर्ज मंजुरीचे अधिकार स्थायी समितीस आहेत.
|
| |
- ग्रामीण
तिर्थक्षेत्र विकास जिल्हा वार्षिक योजना -
ग्रामीण
भागातील तिर्थक्षेत्र विकास योजनेतंर्गत जिल्हा वार्षिक योजना
व राज्यस्तरावरील उपलब्ध निधीमधुन निधी वितरीत करण्यात
येतो.तथापि जिल्हा योजनांसाठी वितरित करण्यात
येणा-या जिल्हा नियोजन समितीमार्फत प्राप्त होतो.जिल्हा वार्षिक योजनेसाठी जिल्हा
नियोजन समितीने मान्य केलेल्या अर्थसंकल्पीय प्रकाशनात केल्या असून जिल्हयासाठी
असलेल्या एकूण तरतुदीचे वितरण नियोजन विभागामार्फत जिल्हाधिकारी यांना विहित
कार्यपध्दतीनुसार वितरीत करण्यात येते.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियोजन विभागाकडील प्राप्त निधीमधून जिल्हयातील
तिर्थक्षेत्र विकासाबाबतचे प्रस्ताव,त्यांचे महत्त्व,प्राधान्यक्रम व रोख प्रवाह
इत्यादीचा विचार
करुन जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येते. सदर योजनेतंर्गत खालील कामे मंजूर करण्यात येतात.
तिर्थक्षेत्र विकासाविषयक कामाचे स्वच्छतागृह,स्नानगृह,पाणीपुरवठा,भक्तनिवास,तिर्थक्षेत्र
परिसरातील पथदिवे,वाहनतळ,घाटबांधकाम व संरक्षण भिंत इत्यादी कामे केली जातात.
|
| |
- महाराष्ट्र
ग्रामीण रोजगार योजना -
ग्रामिण भागाचे सुयोग्य विकासाचे धोरण आखून उपलब्ध मानवी संपत्तीव्दारा ग्रामीण
भागात टिकाऊ सामुहिक मालमत्ता निर्माण करीत असतानाच ग्रामीण भागात राहणा-या व अंग
मेहनतीची अकुशल कामे करणा-या मजूरांना रोजगार उपलब्ध व्हावा हे या योजनेचे प्रमुख
उद्दिष्ट आहे.ग्रामीण भागातील कुटुंबाला 100 दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्याचे कार्य
या योजनेव्दारे म्हणजेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगारहमी योजना केले जाते.
सदर योजनेतंर्गत खालील कामे करण्यात येतात.
- जलसंधारण
व जलसंवर्धन कामे.
- दुष्काळ प्रतिबंधक कामे (वनीकरणासहित).
- जलसिंचन कालव्याची कामे.
- अनुसूचित जाती/जमाती,नवीन भुधारक किंवा इंदिरा आवास योजनेच्या
लाभार्थ्यांच्या जमिनीसाठी जलसिंचन निर्माण करण्याची
कामे.
- पारंपारिक पाणी साठयाचे योजनेचे नुतनीकरण करणे व तलावातील
गाळ काढणे.
- भूविकास कामे.
- पूरनियंत्रण व पूर संरक्षक कामे.
- ग्रामीण भागात बारमाही जोड रस्त्याची कामे.
|
| |
- संत गाडगेबाबा
ग्राम स्वच्छता अभियान
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान हे राज्यात सन 2001-02
पासून राबविण्यात येत आहे. सन 2003-04 पासून सन 2007-08 पर्यंत
सदरचे अभियान शासन निर्णय दि. 24.09.2003
अन्वये राबविण्यात येत होते. परंतु सन 2008-09 पासून सदरचे अभियान महाराष्ट्र
शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय क्र. अभियान-1008/
प्र.क्र. 177/ पापु-16/
मंत्रालय मुंबई 32 दि. 15 सप्टेंबर 2008 अन्वये राबविण्यात येत आहे.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा मुळ उद्देश ग्रामीण जनतेचे आरोग्यमान
उंचावण्याचा आहे. अस्वच्छतेमुळे उद्भवणा-या रोगांमुळे पिडीत जनतेची आकडेवारी
पाहता शासनास अपेक्षित
असलेला उद्देश सफल न झाल्याने स्वच्छतेच्या प्रचार पसिध्दीसाठी तसेच ग्रामीण
जनतेस हा कार्यक्रम आपला वाटावा, ग्रामस्थांचा सक्रिय आणि सातत्यापूर्ण सहभाग
यांचा समावेश
अभियान कार्यक्रमात करून घेण्याची प्रभावी तरतुद केली आहे.
|
| |
|
शासनाने अभियान राबविण्यासाठी
राज्यात एकसुत्रीपणा यावा यासाठी वार्षिक नियोजन निश्चित
करून दिलेले आहे.
|
| दिनांक |
करावयाची कार्यवाही |
दि.
01 ते 25 सप्टेंबर
|
मा. पालकमंत्री यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरीय आढावा बैठक घेणे. |
दि.
26 ते 29 सप्टेंबर
|
गट विकास अधिकारी गट स्तरावरील बैठक आयोजित करतील. |
दि.
30 सप्टेंबर
|
मा. सरपंच ग्रामपंचायतींच्या मासिक सभा घेतील. |
दि.
01 ऑक्टोबर
|
महिला ग्रामसभा |
दि.
02 ऑक्टोबर
|
अभियानाची औपचारिक सुरवात सर्व ग्रामपंचायत ग्रामसभा आयोजीत करतील. |
दि.
03 ते 04 ऑक्टोबर
|
स्वच्छता विषयक साहीत्याचे प्रदर्शन, प्रचार प्रसिध्दी व प्रात्यक्षिके याबाबतच्या
तांत्रिक
ज्ञानाबाबतची प्रात्यक्षिके, गवंडी मेळावा. |
दि.
05 व 07 ऑक्टोबर
|
ग्राम सफाई व घा कचरा व्यवस्थापन कचरा मुक्ती जागृती मोहीम. |
| दि.
08 व 09 आक्टोंबर |
वैयक्तिक स्वच्छता जागृती (नखे काढणे, स्वच्छ आंघोळ, केस धुणे, उवा निर्मुलन मोहीम.) |
दि.
10 व 14 ऑक्टोंबर
|
घर परिसर स्वच्छता व सजावट मोहीम. |
दि.
15 ऑक्टोबर
|
हात धुवा मोहिम. |
दि.
16 व 18 ऑक्टोंबर
|
शाळा व अंगणवाडी स्वच्छता जागृती मोहीम. |
दि.
19 व 20 ऑक्टोबर
|
सार्वजाकि इमारती स्वच्छता जागृती मोहिम. |
| दि.
21 व 22 ऑक्टोबर |
जनावरे स्वच्छता मोहीम, आदर्श गोठा व स्वच्छ
जनावर स्पर्धा. |
दि.
23 व 28 ऑक्टोबर
|
रस्ते दुरूस्ती सफाई व श्रमदान मोहीम. |
दि.
29 ते 31 ऑक्टोबर
|
पाणी शुध्दता, प्रात्यक्षिक व प्रशिक्षण मोहिम. |
दि.
1 ते 5 नोव्हेंबर
|
गटारे सांडपाणी निर्मूलन, सांडपाणी वापर मोहिम |
दि.
6 नोव्हेंबर
|
गावात स्लोगन (घोषवाक्य) स्पर्धा, निबंध स्पर्धा व्यसन मुक्ती स्पर्धा. |
दि.
7 ते 8 नोव्हेंबर
|
सुदृढ बालक स्पर्धा, माता बाल संगोपन. बचत गटाचा सहभाग. |
दि. 9
नोव्हेंबर
|
रोग निदान व साथरोग प्रतिबंध मोहिम, पाणी गुणवत्ता. |
दि. 10
ते 30 डिसेंबर
|
शौचालय बांधकाम दुरुस्ती व शौचालय वापराबाबत जनजागृती करणे, स्वच्छतेच्या इतर सर्व
घटकावर भर देणे. |
| दि. 31
डिसेंबर |
संकल्प दिवस. |
|
|
वरील प्रमाणे निश्चित
केलेल्या कालावधीत ग्रामपंचायतींनी कोणती कार्यवाही केली त्याचे
विविध स्तरावर मुल्यमापने केली जातात.
|
मुल्यमापने |
|
बक्षिसे |
प्रभाग |
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 50 मतदार संघ आहेत.
यामध्ये मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निश्चित केलेल्या
एका प्रभागाने दुस-या प्रभागाचे प्रभाग स्तरीय मुल्यमापन
करणे आवश्यक आहे. प्रत्येक प्रभागामध्ये 01 ते 03 क्रमांकाची
निवड केली जाते.
|
जिल्हा परिषदेने स्वउत्पन्नातून प्रभाग स्तरावर क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींना
5,000/-, 3,000/- आणि 2,000/- याप्रमाणे बक्षिस रकमा देणे आवश्यक
आहे.
|
तालुका |
प्रभाग स्तरावर प्रथम 03 क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींचे तालुका
स्तर मुल्यमापन केले जाते. यामध्ये मा. विभागीय आयुक्त कोकण
विभाग यांनी निश्चित केलेल्या एका तालुका स्तरीय समितीने
दुस-या तालुक्यातील प्रभाग स्तरावर 01 ते 03 क्रमांक प्राप्त
ग्रामपंचायतींची तपासणी करणे आवश्यक आहे. तालुका स्तरावर
01 ते 03 क्रमांक प्राप्त ग्रामपंचायती, एक शाळा आणि एक अंगणवाडी
यांची निवड केली जाते.
|
तालुका स्तरावर क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींना 25,000/-, 15,000/- आणि 10,000/-
याप्रमाणे तसेच शाळेसाठी 10,000/- आणि 5,000/- याप्रमाणे बक्षिसे
वितरीत केली जातात. यासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून देण्यात
येते.
|
जिल्हा |
तालुका स्तरावर प्रथम 02 क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींचे जिल्हा
स्तरीय मुल्यमापन केले जाते. यामध्ये शासनाने निश्चित केलेल्या
एका जिल्हा स्तरीय समितीने दुस-या जिल्हयातील तालुका स्तरावर
01 ते 02 क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींची तपासणी करणे आवश्यक
आहे. जिल्हा स्तरावर 01 ते 03 क्रमांक प्राप्त ग्रामपंचायती,
एक शाळा आणि एक अंगणवाडी यांची निवड केली जाते.
|
जिल्हा स्तरावर क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींना 5,00,000/-, 3,00,000/- आणि 2,00,000/-
याप्रमाणे तसेच शाळेसाठी 50,000/- आणि 25,000/- याप्रमाणे बक्षिसे
वितरीत केली जातात. यासाठी शासनाकडून अनुदान उपलब्ध करून देण्यात
येते. |
विभाग |
जिल्हा स्तरावर प्रथम 03 क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींचे विभाग
स्तरीय मुल्यमापन केले जाते. यामध्ये शासनाने निश्चित केलेल्या
एका विभाग स्तरीय समितीने दुस-या विभागातील जिल्हा स्तरावर
01 ते 02 क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींची तपासणी करणे आवश्यक
आहे. जिल्हा स्तरावर 01 ते 03 क्रमांक प्राप्त ग्रामपंचायती,
एक शाळा आणि एक अंगणवाडी यांची निवड केली जाते.
|
विभाग स्तरावर क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींना 10,00,000/-, 8,00,000/- आणि 6,00,000/-
याप्रमाणे तसेच शाळेसाठी 1,00,000/- आणि 50,000/- याप्रमाणे
बक्षिसे विभाग स्तरावरून वितरीत केली जातात. यासाठी शासनाकडून
विभाग स्तरावर अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.
|
राज्य |
विभाग स्तरावर प्रथम 03 क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींचे राज्य
स्तरीय मुल्यमापन केले जाते. यामध्ये राज्य स्तरावर 01 ते
03 क्रमांक प्राप्त ग्रामपंचायती, एक शाळा आणि एक अंगणवाडी
यांची निवड केली जाते.
|
राज्य स्तरावर क्रमांक प्राप्त ग्रामपंचायतींना 25,00,000/-, 20,00,000/- आणि 15,00,000/-
याप्रमाणे तसेच शाळेसाठी 3,00,000/- आणि 1,00,000/- याप्रमाणे
बक्षिसे राज्य स्तरावरून वितरीत केली जातात. |
|
|
वरील प्रमाणे मुल्यमापन करताना लोकसख्येनुसारही जादा
गुण दिले जातात.
|
लोकसंख्या
|
द्यावयाचे गुण |
1000 |
प्रत्यक्ष मिळालेले गुण + |
1001-3000 |
प्रत्यक्ष मिळालेले गुण + त्या गुणाच्या 2% |
3001-6000 |
प्रत्यक्ष मिळालेले गुण + त्या गुणाच्या 3% |
6001 |
प्रत्यक्ष मिळालेले गुण + त्या गुणाच्या 5% |
|
|
| अभियानपुर्व ग्रामपंचायतीमध्ये
काय स्थिती होती आणि अभियानकाळात ग्रामपंचायतीने काय काम केले याची
माहिती मिळावी तसेच स्वच्छतेच्या कामास गती यावी आणि स्वच्छतेच्या
कामात सातत्य रहावे यादृष्टीने ग्रामपंचायतींचे अ,ब,क नुसार प्रतवारी
करून स्पर्धा घेण्याचा आणि त्या अंतर्गत निवडलेल्या ग्रामपंचायतींना
रोख पारितोषिके दिली जातात. |
| |
जिल्हा,
विभाग आणि राज्य स्तरावर खालीलप्रमाणे विशेष पुरस्कार
वितरीत केले जातात.
|
| |
|
जिल्हा
|
विभाग
|
राज्य |
| कुटुंब कल्याण
पुरस्कार |
स्व. आबासाहेब खेडेकर
|
20,000/- |
30,000/- |
1,00,000/- |
पिण्याचे
पाणी आणि सांडपाणी व्यवस्थान पुरस्कार
|
स्व. वसंतराव नाईक |
20,000/- |
30,000/- |
1,00,000/- |
| सामाजिक
एकता पुरस्कार |
डॉ. बाबासाहेब आंबेडकर |
20,000/-
|
30,000/- |
1,00,000/- |
|
|
सन
2008-09 मध्ये खालील ग्रामपंचायतींना तालुका स्तरावर
क्रमांक प्राप्त झालेले आहे.
|
अ.
क्र. |
तालुका |
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान (ग्रामपंचायत) (गुण %
मध्ये)
|
शाहू, फुले, आंबेडकर दलीत वस्ती विकास व सुधारण अभियान (दलीत वस्ती.) (गुण % मध्ये) |
प्रथम / द्वितीय
|
प्राप्त गुण |
लोकसंख्या |
प्रथम / द्वितीय |
प्राप्त गुण |
लोकसंख्या |
1 |
कुडाळ |
पणदुर |
94.20 |
1144 |
गावराई |
92.40 |
81 |
पिंगुळी |
93.80 |
7226 |
पिंगुळी |
89.20 |
319 |
2 |
वैभववाडी |
कुर्ली |
65.60 |
1942 |
सांगुळवाडी |
64.00 |
172 |
उंबर्डे |
64.20 |
2672 |
मांगवली |
62.80 |
147 |
3 |
सावंतवाडी |
मळेवाड |
70.33 |
3381 |
नेतर्डे |
66.13 |
1828 |
मळगाव |
69.68 |
4734 |
मळेवाड |
64.12 |
3381 |
4 |
कणकवली |
वारगाव |
71.14 |
1871 |
नांदगाव |
70.50 |
182 |
खारेपाटण |
70.81 |
4271 |
भिरवंडे |
69.25 |
207 |
5 |
वेंगुर्ला |
कुशेवाडा |
76.24 |
1468 |
आसोली |
77.01 |
207 |
परबवाडा |
67.05 |
1290 |
म्हापण |
72.10 |
388 |
6 |
देवगड |
वाघोटन |
73.09 |
1652 |
पडेल |
76.70 |
215 |
कुणकेश्वर |
71.73 |
2447 |
जामसंडे |
74.30 |
308 |
7 |
दोडामार्ग |
कळणे |
93.49 |
1179 |
दोडामार्ग |
72.10 |
152 |
तळकट |
89.00 |
992 |
कुंब्रल |
71.40 |
187 |
8 |
मालवण |
देवबाग |
77.52 |
2912 |
सुकळवाड |
74.66 |
260 |
मसुरे |
75.95 |
6333 |
त्रिंबक |
73.00 |
127 |
|
|
सन
2007-08 मध्ये खालील ग्रामपंचायतींना जिल्हा स्तरावर
क्रमांक प्राप्त झालेले आहे.
|
ग्रामपंचायतींचे
नाव |
तालुका |
क्रमांक |
परबवाडा
|
वेंगुर्ला
|
प्रथम क्रमांक |
वायरी
भूतनाथ |
मालवण |
द्वितीय क्रमांक |
कातवण |
देवगड |
तृतिय क्रमांक |
|
| |
शाळा
/ अंगणवाडीचे नाव |
तालुका |
क्रमांक |
परबवाडा
शाळा |
वेंगुर्ला
|
प्रथम |
पणदूर केंद्र
क्र. 05 अंगणवाडी |
कुडाळ |
प्रथम क्रमांक
|
|
| |
खालीलप्रमाणे
ग्रामपंचायतीना विभाग आणि राज्य स्तरावर क्रमांक प्राप्त
झालेले आहेत.
|
सन |
ग्रामपंचायतीचे नाव |
विभाग स्तर |
राज्य स्तर |
2001-02 |
तळवडे ता. सावंतवाडी
|
प्रथम |
तृतिय |
2004-05 |
आंबडोस ता. मालवण
|
द्वितीय |
-- |
2005-06 |
आंबडोस ता. मालवण |
प्रथम |
प्रथम |
2007-08 |
परबवाडा ता. वेंगुर्ला |
द्वितीय |
-- |
|
|
| विशेष
कामगिरी -
सन 2001-02 मध्ये उत्कृष्ठ काम केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला
रक्कम रूपये 2.50 लाख एवढया रकमेचे बक्षिस सन 2002-03 मध्ये प्राप्त
झाले आहे. |
| |
| पंचायत राज संस्थांच्या बळकटीकरणासाठी 12 वा वित्त आयोग अंतर्गत
पंचायत राज संस्थांच्या तिनही स्तरावर विकास कामांसाठी अनुदान
वितरीत करण्यात येते यामध्ये पंचायत राज संस्थांच्या
तिन स्तरावर कोणती कामे घ्यावित याबाबत शासनाने शासन निर्णय महाराष्ट्र शासन,
शासन निर्णय क्रमांक - बाविआ-2005/ प्र.क्र. 390/ वित्त-4/
ग्राम विकास व जल संधारण विभाग
मंत्रालय मुंबई 400 032 दि. 03.12.2005 आणि महाराष्ट्र शासन शासन निर्णय पूरक/
शुध्दीपत्रक क्रमांक - बाविआ-2005/ प्र.क्र. 390/ वित्त-4/
ग्राम विकास व जल संधारण विभाग मंत्रालय
मुंबई 400 032 दि. 05.01.2006 अन्वये निश्चित स्वरूपाच्या सूचना दिलेल्या आहेत.
जिल्हा स्तरावरील कामे-
1. मोठया पाणी पुरवठा योजनांचे पुनरू:जीवन व विस्तारीकरण.
2. गावाअंतर्गत सिमेंट काँक्रीटची गटारे व अनुषंगिक रस्ते.
3. तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी पाणी पुरवठा व स्वच्छता सोई सुविधा
पुरविणे
4. प्राथमिक आरोग्य केंद्र दुरूस्ती व रूग्णांसोबत येणा-या
व्यक्तिसाठी सुविधा.
5. ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम.
6. फॉगिंग मशिन, जल शुध्दीकरण यंत्रणा इ. साहित्य जिल्हा परिषदांनी
आवश्यकतेनुसार राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेने खरेदी .
पंचायत
समिती स्तरावरील कामे -
1. शाळांमध्ये शुध्द पाण्याची व्यवस्था व सोई सुविधा.
2. दहन दफन भूमी व्यवस्था.
3. अंगणवाडी दुरूस्ती देखभाल व सोईसुविधा.
4. प्राथमिक शाळांच्या वर्गखोल्यांची दुरूस्ती.
5. पशुवैदयकिय दवाखाने दुरूस्ती व सुविधा.
ग्रामपंचायत स्तरावरील कामे-
1. पाणी पुरवठा योजना दूरूस्ती व देखभाल.
2. गटारे व अनुषंगिक रस्ते दुरूस्ती व देखभाल.
3. सार्वजनिक संडास दुरूस्ती.
4. ग्राम स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन (ट्रॅक्टर, ट्रॉली इ. ची खरेदी व दुरूस्ती.)
5. ग्रामपंचायत कार्यालय देखभाल व दुरूस्ती.
6. मुख्य उद्दीष्टांना धरुन इतर अनुषंगिक कामे.
|
|
| 12 वा वित्त आयोग
अंतर्गत जिल्हा निधीतून खालीलप्रमाणे कामे करण्यात आली आहेत.
|
12
वा वित्त आयोग मधून घेण्यात आलेली कामे (ग्रामपंचायत कार्यालय
बांधकाम करणे.)
- (जिल्हा स्तर.) |
| |
| अ.क्र |
कामाचे नांव |
अ.प.र.रू. |
मंजूर रक्कम |
झालेला खर्च |
प्रशा. मान्यता क्र.
व दिनांक |
1 |
शिरवंडे ग्रा.पं. कार्यालय इमारत बांधणे ता.मालवण
|
3,60,000/-
|
3,60,000/-
|
3,13,033/-
|
3525/07
26.03.2007 |
2 |
वेरळ ग्रा.पं. कार्यालय इमारत बांधणे ता. मालवण
|
4,24,888/-
|
4,24,163/-
|
4,03,965/-
|
1875/07
16.10.2007 |
3 |
मसदे चुनवरे ग्रा.पं. कार्यालय इमारत बांधणे ता. मालवण |
4,25,000/-
|
4,24,888/- |
4,24,888/- |
2335/07
29.11.2007 |
4 |
कोंडये ग्रा.पं. कार्यालय इमारत बांधणे ता. कणकवली
|
1,45,658/- |
1,39,905/- |
1,39,905/- |
1875/07
16.10.2007 |
5 |
वारगाव ग्रा.पं. कार्यालय इमारत बांधणे ता. कणकवली
|
3,72,451/- |
3,72,451/-
|
3,72,000/- |
217/08
25.04.2008 |
|
एकूण |
17,27,997/-
|
17,21,407/- |
17,21,407/- |
-- |
|
|
विशेष निधी
ग्रामपंचायतीची स्वत:ची इमारत नसलेल्या अनेक ग्रामपंचायती राज्यात
अस्तित्वात असून अशा ग्रामपंचायतींची कार्यालये इतर ईमारतीमध्ये
अथवा भाडयाने इतर ठिकाणी कार्यरत आहेत. त्यापैकी अनेक इमारतींचे
स्वउत्पन्न लक्षात घेता सदर उत्पन्नातून ग्रामपंचायत इमारत
बांधणे अशक्य असून अशा ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत भवन /
कार्यालय बांधून
देणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासन ग्राम विकास व
जल संधारण विभागाकडील शासन निर्णय क्र. बाविआ-2006/ प्र.क्र.
694/
वित्त-4/ मंत्रालय मुंबई 400 032 दि. 16.04.2008 अन्वयेने
एकूण 15 ग्रामपंचायत कार्यालयीन इमारती बांधकाम करण्यासाठी
रक्कम रूपये
60.00 लाख अनुदान प्राप्त झाले आहे.
|
| |
| 12
वा वित्त आयोग अंतर्गत विशेष निधीमधून ग्रा.पं. कार्यालयीन इमारत
बांधकाम करणे ही खालीलप्रमाणे कामे सन 2007-08 मध्ये मंजूर केली
आहेत. - |
| |
|
अ.क्र
|
कामाचे
नांव
|
प्रशा. मान्यता क्र.
व दिनांक
|
मक्ता कोणाला दिला / दिनांक
|
1 |
2
|
3
|
4
|
1 |
ग्रामपंचायत कार्यालयील इमारत बांधकाम करणे कोळंब ता. मालवण
|
939/08 -
27.06. 2008 |
मा. सरपंच |
2 |
ग्रामपंचायत कार्यालयील इमारत बांधकाम करणे घुमडे ता. मालवण
|
939/08 -
27.06. 2008 |
मा. सरपंच |
3 |
ग्रामपंचायत कार्यालयील इमारत बांधकाम करणे कांदळगाव ता. मालवण
|
1994/08 -
08.09. 2008 |
मा. सरपंच |
4 |
ग्रामपंचायत कार्यालयील इमारत बांधकाम करणे कोळपे ता. वैभववाडी
|
2520/08 -
24.10. 2008 |
मा. सरपंच |
5 |
ग्रामपंचायत कार्यालयील इमारत बांधकाम करणे कारीवडे ता. सावंतवाडी
|
2521/08 -
24.10. 2008 |
मा. सरपंच |
6 |
ग्रामपंचायत कार्यालयील इमारत बांधकाम करणे एडगाव वायंबोशी
ता. वैभववाडी
|
2522/08 -
24.10. 2008 |
मा. सरपंच |
7 |
ग्रामपंचायत कार्यालयील इमारत बांधकाम करणे विलवडे ता. सावंतवाडी
|
3615/09 -
21.01. 2009 |
मा. सरपंच |
8 |
ग्रामपंचायत कार्यालयील इमारत बांधकाम करणे बांबुळी ता. कुडाळ
|
3616/09 -
21.01. 2009 |
मा. सरपंच |
9 |
ग्रामपंचायत कार्यालयील इमारत बांधकाम करणे साळगाव ता. कुडाळ
|
3617/09 -
21.01. 2009
|
मा. सरपंच |
10 |
ग्रामपंचायत कार्यालयील इमारत बांधकाम करणे गढीताम्हाणे ता. देवगड
|
3618/09 -
21.01. 2009 |
मा. सरपंच |
11 |
ग्रामपंचायत कार्यालयील इमारत बांधकाम करणे दिगवळे ता. कणकवली
|
5272/09 -
26.01. 2009 |
मा. सरपंच |
12 |
ग्रामपंचायत कार्यालयील इमारत बांधकाम करणे हुमरमळा (वालावल) ता. कुडाळ
|
3620/09 -
21.01. 2009 |
मा. सरपंच |
13 |
ग्रामपंचायत कार्यालयील इमारत बांधकाम करणे झरे-2 ता. दोडामार्ग
|
3621/09 -
21.01. 2009 |
मा. सरपंच |
14 |
ग्रामपंचायत कार्यालयील इमारत बांधकाम करणे परबवाडा ता. वेंगुर्ला
|
3917/09 -
02.02. 2009 |
मा. सरपंच |
15 |
ग्रामपंचायत कार्यालयील इमारत बांधकाम करणे हळवल ता. कणकवली
|
5247/09 -
25.02. 2009 |
मा. सरपंच |
|
|
| व्याज
रकमेमधून मंजूर केलेली कामे. |
| |
|
अ.क्र
|
कामाचे
नांव
|
प्रशा.
मान्यता क्र. व दिनांक
|
मक्ता
कोणाला दिला / दिनांक
|
1
|
2
|
3
|
4
|
1
|
ग्रामपंचायत कार्यालयील इमारत बांधकाम करणे पोईप ता. मालवण |
5274/09
26.02.2009
|
मा.
सरपंच
|
|
|
| |
|
 |
 |
 |
|
|