सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेविषयी
रचना
मान्यवर
प्रशासन
जि. प. अधिनियम
सूची
माहितीचा अधिकार
विभाग व योजना
ई-गव्हर्नंस
अंदाज पत्रक
सदस्य व पदाधिकारी
मुख्य पान सिंधुदुर्ग जिल्ह्याविषयी प्रतिक्रिया संपर्क
निविदा जाहिराती बातम्या भरती प्रक्रिया
 
कृषि विभाग
   
  • शेती कॉलेजमधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

योजनेचे उदिष्ठ -

कोकण कृषि विद्यापीठातील कार्यक्षेत्रातील शेती कालेज मघ्ये शिक्षण घेणा-या व सिंधुदुर्ग जिल्हयाचे रहिवाशी असणा-या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देणे. जेणेकरुन विद्यार्थ्याना काही प्रमाणात आर्थिक मदत दिल्याने आपले शिक्षण बाहेरगावी राहून पूर्ण करु शकतील.

योजनेची कार्यपध्दती -

शेती कॉलेजमधून सिंधुदुर्ग जिल्हयातील विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देणेकरीताचे परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झालेवर प्रति विद्यार्थी प्रति महा रु..500/-प्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम संबधित शेती कॉलेज कडे संबधित विद्यार्थ्याला आदा करण्यासाठी धनादेशाने पाठवीली जाईल.

याकरीता खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील -

    • विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्हयाचा रहिवासी असावा.(तसा सरपंचांचा दाखला आवश्यक)
    • कोकण कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शेती कॉलेज मध्ये शिक्षण घेणा-या प्रथम ते चतुर्थ वर्षाच्या एकूण 12 विद्यार्थ्याना गुणानूक्रमे प्रत्येक वर्षाच्या प्रथम तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देय राहिल.
    • विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रतिमहा 80 टक्के पेक्षा अधिक असावी. (हजेरी पट आवश्यक, हजेरीपट पाठविताना एकूण कामाचे दिवस,पैकी हजर दिवस व टक्केवारी सह पाठवावा)
    • विद्यार्थ्यांचे बँकेत खाते असणे आवश्यक (प्रस्तावासोबत बँक खाते नंबर व बँकेचे नांव कळविणे)
    • विद्यार्थ्यांस इतर कोणत्या प्रकारची शिष्यवृत्ती देय असता कामा नये.(तसा प्रस्तावासोबत सहयोगी अधिष्ठाता यांचा दाखल आवश्यक)
    • विद्यार्थ्यांना प्रतिमहा र.रु.500/- प्रमाणे शिष्यवृत्ती देय राहिल.
     वर
  • शेती शाळेतील विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती

योजनेचे उदिष्ठ -

कोकण कृषि विद्यापीठातील कार्यक्षेत्रातील शेती शाळेमध्ये शिक्षण घेणा-या व सिंधुदुर्ग जिल्हयाचे रहिवाशी असणा-या प्रथम व द्वितीय वर्षाचे गुणानुक्रमे प्रतिवर्षी 3 विद्यार्थ्याना शिष्य्ावृत्ती देणे. जेणेकरुन विद्यार्थ्याना काही प्रमाणात आर्थिक मदत दिल्याने आपले शिक्षण बाहेरगावी राहून पूर्ण करु शकतील.

योजनेची कार्यपध्दती -

विद्यापीठाकडुन प्रस्तावित केलेल्या शेती शाळेतील सिंधुदुर्ग जिल्हयाचे रहिवाशी असलेल्या विद्यार्थ्याना शिष्यवृत्ती देणेकरीताचे परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झालेवर प्रति विद्यार्थी प्रति महा रु.400/-प्रमाणे शिष्यवृत्तीची रक्कम संबधित शेती शाळेकडे संबधित विद्यार्थ्याचे बँक खाती जमा करण्यासाठी धनादेशाने पाठवीली जाईल.

याकरीता खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक राहील -

    • विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्हयाचा रहिवासी असावा.(तसा सरपंचांचा दाखला आवश्यक)
    • शिक्षणाचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी शिष्यवृत्ती घेत असलेला विद्यार्थी शिक्षण अर्धवट सोडून गेल्यास शिष्यवृत्तीची आदा झालेली रक्कम त्याने परत करणेची आहे.(तसे हमीपत्र आवश्यक)
    • कोकण कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील शेती शाळे मध्ये शिक्षण घेणा-या प्रथम ते द्वितीय वर्षाच्या एकूण 6 विद्यार्थ्याना गुणानूक्रमे प्रत्येकी प्रथम तीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देय राहिल.
    • विद्यार्थ्यांची उपस्थिती प्रतिमहा 80 टक्के पेक्षा अधिक असावी. (हजेरी पट आवश्यक, हजेरीपट पाठविताना एकूण कामाचे दिवस,पैकी हजर दिवस व टक्केवारी सह पाठवावा)
    • विद्यार्थ्यांचे बँकेत खाते असणे आवश्यक (प्रस्तावासोबत बँक खाते नंबर व बँकेचे नांव कळविणे)
    • विद्यार्थ्यांस इतर कोणत्या प्रकारची शिष्यवृत्ती देय असता कामा नये.(तसा प्रस्तावासोबत सहयोगी अधिष्ठाता यांचा दाखल आवश्यक)
    • विद्यार्थ्यांना प्रतिमहा र.रु.200/- प्रमाणे शिष्यवृत्ती देय राहिल.

     वर
  • जिल्हा पातळी भात पिक स्पर्धा विजेत्या स्पर्धकांचा सत्कार

योजनेचे उदिष्ठ -

अधिकाधिक शेतक-यांनी भात पिकाकडे वळुन सुधारीत पध्दतीने शेती करावी या हेतुने जिल्हा परिषदेमार्फत शासन लक्षांकानुसार प्रतिवर्षी जिल्हा पातळी भात पिक स्पर्धा आयोजित करणेत येते सदर स्पर्धेस पथम व द्वितीय क्रमांक प्राप्त शेतक-यांचा शाल , श्रीफळ देऊन सत्कार करणे

योजनेची कार्यपध्दती -

    • शासन मार्गदर्शक सुचनानुसार जिल्हयात पिक स्पर्धा आयोजित करुन प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विजेते निश्चित करणे
    • प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांचा श्राल , श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानपुर्वक सत्कार करणे.
         वर
  • राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम

योजनेचे उदिष्ठ -

जंगलतोडीला आळा घालुन प्रदुषण कमी करणे.

योजनेची कार्यपध्दती -

    • बायोगॅस बांधकामासाठी अनु. जाती/ जमाती , अल्प भुधारक, भुमिहिन व डोंगराळ भागातील लाभार्थिना र.रु. 3500/- प्रति संयंत्र अनुदान मंजुर केले जाते . इतर लाभार्थिना र.रु. 3800/- अनुदान मंजुर होते.
    • शेती करणारा कोणताही शेतकरी सदर योजनेचा लाभ घेणेस पात्र आहे.
    • पात्र लाभार्थिना आपला मागणी अर्ज व अनुदान मागणी प्रस्ताव ग्रामपंचायती मार्फत पंचायत समितीकडे सादर करावा.
         वर
  • शेतकरी सहल

योजनेचे उदिष्ठ -

राज्यामध्ये कृषि क्षेत्रात झालेल्या बदल तसेच कृषि तंत्र ज्ञानाविषयक झालेल्या प्रगतीची व निरनिराळया लागवड पध्दतीची माहिती शेतक-याना प्रत्यक्ष होणेसाठी संशोधन केंद्र व कृषि विदयापीठ , प्रगतशील शेतकरी यांचे प्रक्षेत्रास भेट देऊन शेती विषयक झालेल्या बदलाची माहिती घेणे.

योजनेची कार्यपध्दती -

शासन ग्राम विकास विभागाकडील शासन निर्णय क्रमांक एसटीडी-1079/ सीआर4648/21, दिनांक-15/01/1980 व 26/07/2004. नुसार शेतकरी सहल खालील अटीशर्तीस अधिन राहुन आयोजित करणेत येते. -

    • सहलीचा कार्यक्रम कृषि समिती समत्तीने ठरविण्यात येतो.
    • सहलीत भाग घेणा-या शेतक-यांच्या प्रवासाचाच खर्च करणेत येईल.
    • तरतुदीपेक्षा जास्त खर्च झाल्यास तो खर्च शेतक-यानी करावयाचा आहे.
    • प्रवासात होणारा जेवणाचा राहण्याचा व इतर खर्च शेतक-यानी स्वत: करावयाचा आहे.
    • शेतकरी सहल राज्य परिवहन महामंडळाचे एस.टी. बसने आयोजित करणेत येईल.
    • शेतकरी सहलीस कमीत कमी 30 व जास्तीत जास्त 45 शेतकरी सहभागी होतील
    • सहलीबरोबर शिपाई घेतला जाणार नाही.
    • दोन पेक्षा जास्त अधिकारी सहलीबरोबर असणार नाहीत याची दक्षता घेणेत येईल.
    • जिल्हा परिषदेंतर्गत सर्व पंचायत समित्या मिळून सदर शेतकरी सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे.पंचायत समितीमार्फत स्वतंत्र सहल आयोजीत करण्यात येणार नाही.
    • सहल फक्त महाराष्ट्र राज्यातच आयोजित केली जाणार आहे.
     वर
  • वसंतराव नाईक कृषि भुषण पुरस्कार

योजनेचे उदिष्ठ -

कृषि व कृषि संलग्न क्षेत्रात ग्रामिण विकासात अद्वितीय कामगिरी करणा-यांचा कार्याचा सत्कार करणे.

योजनेची कार्यपध्दती -

    • कृषि व संलग्न क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तिनी सदर पुरस्कारासाठी आपला प्रस्ताव विहीत प्रपत्रात पंचायत समिती कृषि विभागाकडे सादर करावा.
    • पंचायत समिती कृषि विभागाकडुन सदर प्रस्ताव जि.प.कडे सादर केला जातो. जिल्हास्तरीय समितीकडुन पहाणी करुन सदर प्रस्ताव शिफारशीसह विभागीय कार्यालयामार्फत कृषि आयुक्तालयास सादर केला जातो . राज्य स्तरीय समितीकडुन कृषि भुषण पुरस्कारासाठी शेतक-यांची निवड केली जाते.
    • पुरस्कार प्राप्त शेतक-याचा मा.राज्यपाल, महोदय यांचे हस्ते सन्मानपुर्वक सत्कार केला जातो.
     वर
  • वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार

स्वत: शेतकरी नसुनही शेतीची उन्नती होण्यासाठी व उत्पादन वाढविण्यासाठी प्रभावी कार्य करतात व शेतक-यांना मदत करतात अशा व्यक्ती/संस्थाना चालना देणे.

योजनेची कार्यपध्दती -

    • स्वत: शेतकरी नसुनही शेतीची उन्नती होण्यासाठी व उत्पादन वाढविण्यासाठी प्रभावी कार्य करतात व शेतक-यांना मदत करतात अशा व्यक्ती/संस्थानी सदर पुरस्कारासाठी आपला प्रस्ताव विहीत प्रपत्रात पंचायत समिती कृषि विभागाकडे सादर करावा.
    • पंचायत समिती कृषि विभागाकडुन सदर प्रस्ताव जि.प.कडे सादर केला जातो. जिल्हास्तरीय समितीकडुन पहाणी करुन सदर प्रस्ताव शिफारशीसह विभागीय कार्यालयामार्फत कृषि आयुक्तालयास सादर केला जातो . राज्य स्तरीय समितीकडुन शेतीमित्र पुरस्कारासाठी शेतक-यांची निवड केली जाते.
    • पुरस्कार प्राप्त शेतक-याचा मा.राज्यपाल, महोदय यांचे हस्ते सन्मानपुर्वक सत्कार केला जातो.
     वर
  • वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार

योजनेचे उदिष्ठ -

शेती क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या शेतक-यांना सदरचा पुरस्कार देऊन सन्मान करणे.

योजनेची कार्यपध्दती -

    • शेती क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या शेतक-यांने सदर पुरस्कारासाठी आपला प्रस्ताव विहीत प्रपत्रात पंचायत समिती कृषि विभागाकडे सादर करावा.
    • पंचायत समिती कृषि विभागाकडुन सदर प्रस्ताव जि.प.कडे सादर केला जातो. जिल्हास्तरीय समितीकडुन पहाणी करुन सदर प्रस्ताव शिफारशीसह विभागीय कार्यालयामार्फत कृषि आयुक्तालयास सादर केला जातो . राज्य स्तरीय समितीकडुन शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी शेतक-यांची निवड केली जाते.
    • पुरस्कार प्राप्त शेतक-याचा मा.राज्यपाल, महोदय यांचे हस्ते सन्मानपुर्वक सत्कार केला जातो.
     वर
  • पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार

योजनेचे उदिष्ठ -

कृषि उत्पादन, कृषि विस्तार, निर्यात, कृषि प्रक्रीया, पिक फेरबदल, कृषि उत्पादन वाढीसाठी वापरलेले आधुनिक तंत्रज्ञान यामधील कार्याचा विचार करुन व्यक्ती/संस्थाचा सन्मान
करणे.

योजनेची कार्यपध्दती -

    • कृषि उत्पादन, कृषि विस्तार, निर्यात, कृषि प्रक्रीया, पिक फेरबदल, कृषि उत्पादन वाढीसाठी वापरलेले आधुनिक तंत्रज्ञान यामधील कार्यरत व्यक्ती/संस्थानी सदर पुरस्कारासाठी आपला प्रस्ताव विहीत प्रपत्रात पंचायत समिती कृषि विभागाकडे सादर करावा.
    • पंचायत समिती कृषि विभागाकडुन सदर प्रस्ताव जि.प.कडे सादर केला जातो. जिल्हास्तरीय समितीकडुन पहाणी करुन सदर प्रस्ताव शिफारशीसह विभागीय कार्यालयामार्फत कृषि आयुक्तालयास सादर केला जातो . राज्य स्तरीय समितीकडुन शेतीमित्र पुरस्कारासाठी शेतक-यांची निवड केली जाते.
    • पुरस्कार प्राप्त शेतक-याचा मा.राज्यपाल, महोदय यांचे हस्ते सन्मानपुर्वक सत्कार केला जातो.
     वर
  • जिजामाता कृषिभुषण पुरस्कार

योजनेचे उदिष्ठ -

शेती क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या महिलांचा सन्मान करणे .

योजनेची कार्यपध्दती -

    • शेती क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या महिलांनी सदर पुरस्कारासाठी आपला प्रस्ताव विहीत प्रपत्रात पंचायत समिती कृषि विभागाकडे सादर करावा.
    • पंचायत समिती कृषि विभागाकडुन सदर प्रस्ताव जि.प.कडे सादर केला जातो. जिल्हास्तरीय समितीकडुन पहाणी करुन सदर प्रस्ताव शिफारशीसह विभागीय कार्यालयामार्फत कृषि आयुक्तालयास सादर केला जातो . राज्य स्तरीय समितीकडुन शेतीमित्र पुरस्कारासाठी शेतक-यांची निवड केली जाते.
    • पुरस्कार प्राप्त शेतक-याचा मा.राज्यपाल, महोदय यांचे हस्ते सन्मानपुर्वक सत्कार केला जातो.
     वर
  • कृषि यांत्रिकीकरण योजना

योजनेचे उदिष्ठ -

कमी वेळाज कमी मनुष्यबळात जास्तीत जास्त काम व खर्चात बचत करणे.

योजनेची कार्यपध्दती -

    • सदर योजनेअंतर्गत टॅक्टरचलित/स्वयंचलित , बैलचलित , हस्तचलित औजारे ( टॅक्टर, रोटाव्हेटर, टिएम स्पेअर्स, कल्टीवेटर, सीड ड्रिल फर्टीलायझर, रिपर, मल्टीक्रॉप, थ्रेशन, पॅडी ट्रान्सप्लॅन्टर, पॉवर ड्रिव्हन, मल्टीग्रेड, विदयुत पंप , पेट्रोकेरोसीन पंप, डिझेल इंजिन, पिक संरक्षण औजारे, विळे , भात मळणी यंत्र, गार्डन टुल्स, कात्री, गवत कापणी यंत्र आदिचा पुरवठा शेतक-यांना मार्गदर्शक सुचनानुसार केला जातो.
    • सदर योजनेअंतर्गत देय्य अनुदान हे प्रतिवर्षी शासनाकडुन प्राप्त मार्गदर्शक सुचनानुसार बदलते असते सदर अनुदान कमीत कमी 25 ते 50 टक्के किंवा विशिष्ट रक्कमेच्या मर्यादेत देय्य असते.
    • सदर योजनेचा लाभ वैय्यक्ति शेतकरी किंवा शेतकरी समुह संस्थाना देय्य आहे.

आवश्यक कागदपत्रे -

    • मागणी अर्ज
    • 7/12 व 8 अ चा उतारा
    • कोटेशन
    • सहहिश्शेदाराचे संमत्तीपत्र
    • अनुदान मागणी प्रस्ताव.
     वर
  • सुधारलेल्या शेती औजारांवर अनुदान वाटप

योजनेचे उद्दिष्ट -

सुधारीत कृषि औजारांचा अनुदानीत दराने पुरवठा करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक उत्पादनात वाढ करणे.

योजनेची कार्यपध्दती -

    • सुधारीत कृषि औजारे या बाबीवर शासन निर्धारित किंमतीवर शासन योजनेतंर्गत पुरवठा करण्यात येणा-या औजारांवर किंमतीच्या 25% रु.750/- मर्यादेत जे कमी असेल ते पुरक अनुदान देय राहील. मात्र जि.प. योजनेतंर्गत पुरवठा करण्यात येणा-या औजारांवर किंमतीच्या 50% रु.800/- मर्यादेत जे कमी असेल ते अनुदान देय राहील.
    • प्राधान्याने अल्प-अत्यल्प भुधारक शेतक-यांना लाभ देण्यात येईल. असा शेतकरी प्रवृत्त न झाल्यास इतर शेतक-यांना सदर योजनेचा लाभ देणेत येईल.
    • प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वावर निविष्ठा वाटप.
     वर
  • जीवाणू संवर्धन पाकिटांवर अनुदान

योजनेचे उद्दिष्ट -

जीवाणू संवर्धन पाकिटे अनुदानावर पुरवठा करुन पीक उत्पादनात वाढ करणे.

योजनेची कार्यपध्दती -

    • जीवाणू संवर्धन पाकिटे या बाबीवर शासन निर्धारित किंमतीवर 25% जि.प.अनुदान देय राहिल.
    • प्राधान्याने अल्प-अत्यल्प भुधारक शेतक-यांना लाभ देण्यात येईल. असे शेतकरी प्रवृत्त न झाल्यास इतर शेतक-यांना सदर योजनेचा लाभ देणेत येईल.
    • प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वावर निविष्ठा वाटप.
     वर
  • पिक संरक्षण औषधे

योजनेचे उद्दिष्ट -

सिंधुदूर्ग जिल्हयात भात, आंबा, नारळ, सुपारी, भाजीपाला इ. पिकावर ब-याच प्रकारचे किड रोग आढळून येतात. या किड रोगाच्या प्रादुर्भावामुळे ब-याच वेळा पिकाचे नुकसान होते. परिणामी पिक उत्पादनावर विपरीत परिणाम होणेची शक्यता नाकारता येत नाही. सदर किड रोगाचे योग्य वेळी नियंत्रण करणेच्या दृष्टीने शेतक-यांना 50% अनुदानावर किटकनाशके/बुरशीनाशके उपलब्ध करुन देण्यात येती.

योजनेची कार्यपध्दती -

किड रोगाचे नियंत्रण करणेसाठी शेतक-यांना 50% मर्यादेत अनुदानावर किटकनाशके उपलब्ध करुन देण्यात येतील. सदर अनुदान सन 2009-10 मध्ये शासन अनुदान मिळाल्यास पुरक अनुदान म्हणून अन्यथा 50% जिल्हा परिषद अनुदान म्हणून विविध पिकांसाठी अनुदान देय राहील.

     वर
  • पिक संरक्षण औजारांवर शेतक-यांना अनुदान वाटप

योजनेचे उद्दिष्ट -

सुधारीत कृषि औजारांचा अनुदानीत दराने पुरवठा करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पीक उत्पादनात वाढ करणे.

योजनेची कार्यपध्दती -

    • पिक संरक्षण औजारे या बाबीवर शासन निर्धारित किंमतीवर शासन योजनेतंर्गत पुरवठा करण्यात येणा-या औजारांवर किंमतीच्या 25% रु.800/- मर्यादेत जे कमी असेल ते देय्य राहील. मात्र जि.प. योजनेतंर्गत पुरवठा करण्यात येणा-या औजारांवर 25% रु.800/- चे मर्यादेत जे कमी असेल ते अनुदान देय राहील.
    • प्राधान्याने अल्प-अत्यल्प भुधारक शेतक-यांना लाभ देण्यात येईल असे शेतकरी प्रवृत्त न झाल्यास इतर शेतक-यांना सदर योजनेचा लाभ देणेत येईल.
    • प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य या तत्वावर निविष्ठा वाटप.

     वर
  • शेतकरी पाणी वाटप संस्था स्वयंसहाय्यता बचत गटांना ऑईल इंजिन व पाईप पुरविणे व पंप हाऊस साठी अनुदान

योजनेचे उद्दिष्ट -

ऑईल इंजिन व पाईप बचत गटांना पुरवठा करुन शेती उत्पादनात वाढ करणे.

योजनेची कार्यपध्दती -

गटातील स्थापन झालेलया समूह गटांना प्रति ऑईल इंजिन व विद्युत पंपास रु. 10,000/- अनुदान देणे.

     वर
  • बियाणे,खते,किटकनाशक विक्री परवाने देणे

योजनेचे उद्दिष्ट -

शेतीसाठी आवश्यक बि-बियाणे, खते व किटकनाशके शेतक-यांना उपलब्ध होणेसाठी त्यांच्या विक्रीसाठी आवश्यक परवाने मंजूर करणे.

योजनेची कार्यपध्दती -

बि-बियाणे, खते व किटकनाशके विक्रीसाठी आवश्यक परवाने या विभागाकडुन मंजुर करणेत येतात. त्यासाठी विहित नमुन्यामध्ये अर्ज सेतूमार्फत सादर करणे आवश्यक आहे. परवाना मुदत बियाणे तीन वर्ष, खते तीन वर्ष व किटकनाशक दोन वर्ष अशी आहे. त्यानंतर एका महिन्याच्या आत परवाना नुतनीकरण करणे आवश्यक आहे. परवान्यासाठी व नुतनीकरणासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहेत.

नविन परवाना आवश्यक कागदपत्रे - बियाणे

    • बियाणे नियंत्रण आदेश 1983 कलम 4 नुसार विहित फार्म A मध्ये अर्ज
    • चलन (फी भरलेचे स्टेट बँक/ ट्रेझरी) रु 50/-
    • उत्पादक कंपनीचे उगमप्रमाणपत्र व त्यासोबत उगम प्रमाणपत्रातील बियाण्यांपैकी विक्री करावयाच्या बियाण्यांची यादी
    • ग्रामपंचायतीचा/ नगरपरिषद/नगरपालिकेचा नाहरकत दाखला
    • विक्री केंद्राचे जागेचा दिशदर्शक नकाशा
    • जागा स्वत:ची नसल्यास, जागा मालकाचे संमत्ती पत्र रु 100/- च्या स्टँप पेपरवर
    • पोलीस अधीक्षक यांचा मागील तीन वर्षात दंड अगर शिक्षा न झाल्याचा दाखला
    • नमुना 8 /नमुना 43 चा उतारा
    • अर्धवेळ गुणनियंत्रण निरिक्षक यांचा विक्री केंद्राची जागा योग्य असल्याबाबतचा दाखला.

परवाना नुतनिकरण चेक लिस्ट - बियाणे

    • बियाणे नियंत्रण आदेश 1983 कलम 7 नुसार विहित फार्म C मध्ये अर्ज
    • मुळ परवाना
    • चलन (फी भरलेचे स्टेट बँक/ ट्रेझरी) रु 50/- विलंबआकार रु 25/- दरमहा
    • उत्पादक कंपनीचे उगमप्रमाणपत्र व त्यासोबत उगम प्रमाणपत्रातील बियाण्यांपैकी विक्री करावयाच्या बियाण्यांची यादी
    • ग्रामपंचायतीचा/ नगरपरिषद/नगरपालिकेचा नाहरकत दाखला6. विक्री केंद्राचे जागेचा दिशदर्शक नकाशा
    • जागा स्वत:ची नसल्यास, जागा मालकाचे संमत्ता पत्र रु 100/- च्या स्टँप पेपरवर8. नमुना 8 /नमुना 43 चा उतारा
    • पोलीस अधीक्षक यांचा मागील तीन वर्षात दंड अगर शिक्षा न झाल्याचा दाखला
    • अर्धवेळ गुणनियंत्रण निरिक्षक यांचा विक्री केंद्राची जागा योग्य असल्याबाबतचा दाखला.
    • मागिल तीन वर्षातील उलाढालीची माहिती.

नविन परवाना आवश्यक कागदपत्रे - खते

    • ख्रत नियंत्रण आदेश 1985 कलम 8(2) नुसार विहित फार्म AI मध्ये अर्ज
    • चलन (फी भरलेचे स्टेट बँक/ ट्रेझरी) फी किरकोळ रु 450/- घाऊक रु 2250/-
    • उत्पादक कंपनीचे उगमप्रमाणपत्र Form व त्यासोबत उगम प्रमाणपत्रातील खतांपैकी विक्री करावयाच्या खतांची यादी
    • ग्रामपंचायतीचा/ नगरपरिषद/नगरपालिकेचा नाहरकत दाखला5. विक्री केंद्राचे जागेचा दिशदर्शक नकाशा
    • जागा स्वत:ची नसल्यास, जागा मालकाचे संमत्ती पत्र रु 100/- च्या स्टँप पेपरवर
    • पोलीस अधीक्षक यांचा मागील तीन वर्षात दंड अगर शिक्षा न झाल्याचा दाखला
    • नमुना 8 /नमुना 43 चा उतारा
    • अर्धवेळ गुणनियंत्रण निरिक्षक यांचा विक्री केंद्राची जागा योग्य असल्याबाबतचा दाखला.

परवाना नुतनिकरण चेक लिस्ट - खते

    • ख्रत नियंत्रण आदेश 1985 कलम 8(2) नुसार विहित फार्म AI मध्ये अर्ज
    • मुळ प्रमाणपत्र
    • चलन (फी भरलेचे स्टेट बँक/ ट्रेझरी) - किरकोळ रु.450/- विलंब आकार प्रति महा रु 60/-, घाऊक रु 2250/- विलंब आकार प्रति महा रु 75/-
    • उत्पादक कंपनीचे उगमप्रमाणपत्र Form व त्यासोबत उगम प्रमाणपत्रातील खतांपैकी विक्री करावयाच्या खतांची यादी
    • ग्रामपंचायतीचा /नगरपालिका/नगरपरिषदेचा नाहरकत दाखला
    • विक्री केंद्राचे जागेचा दिशदर्शक नकाशा
    • जागा स्वत:ची नसल्यास, जागा मालकाचे संमत्ता पत्र रु 100/- च्या स्टँप पेपरवर
    • नमुना 8 /नमुना 43 चा उतारा
    • अर्धवेळ गुणनियंत्रण निरिक्षक यांचा विक्री केंद्राची जागा योग्य असल्याबाबतचा दाखला.
    • मागिल तीन वर्षातील उलाढालीची माहिती.

नविन परवाना चेक लिस्ट - किटकनाशके

    • किटकनाशक आदेश कलम 10(1) नुसार विहित फार्म क्र VI मध्ये अर्ज
    • चलन (फी भरलेचे स्टेट बँक/ ट्रेझरी) रु 300/-
    • उत्पादक कंपनीचे उगमप्रमाणपत्र Form VI-D व त्यासोबत उगम प्रमाणपत्रातील औषधौपैकी विक्री करावयाच्या किटकनाशकांची यादी
    • ग्रामपंचायतीचा/ नगरपरिषद/नगरपालिकेचा नाहरकत दाखला
    • विक्री केंद्राचे जागेचा दिशदर्शक नकाशा
    • जागा स्वत:ची नसल्यास, जागा मालकाचे संमत्ती पत्र रु 100/- च्या स्टँप पेपरवर
    • पोलीस अधीक्षक यांचा मागील तीन वर्षात दंड अगर शिक्षा न झाल्याचा दाखला
    • नमुना 8 /नमुना 43 चा उतारा
    • अर्धवेळ गुणनियंत्रण निरिक्षक यांचा विक्री केंद्राची जागा योग्य असल्याबाबतचा दाखला.

परवाना नुतनिकरण चेक लिस्ट - किटकनाशके

    • किटकनाशक आदेश कलम 10(1) नुसार विहित फार्म क्र VII मध्ये अर्ज
    • मुळ परवाना
    • चलन (फी भरलेचे स्टेट बँक/ ट्रेझ् ारी) रु 300/- विलंबआकार दरमहा रु 10/-
    • उत्पादक कंपनीचे उगमप्रमाणपत्र Form VI-D व त्यासोबत उगम प्रमाणपत्रातील औषधौपैकी विक्री करावयाच्या किटकनाशकांची यादी
    • ग्रामपंचायतीचा / नगरपरिषद/नगरपालिकेचा नाहरकत दाखला
    • विक्री केंद्राचे जागेचा दिशदर्शक नकाशा
    • जागा स्वत:ची नसल्यास, जागा मालकाचे संमत्ता पत्र रु 100/- च्या स्टँप पेपरवर
    • नमुना 8 /नमुना 43 चा उतारा
    • अर्धवेळ गुणनियंत्रण निरिक्षक यांचा विक्री केंद्राची जागा योग्य असल्याबाबतचा दाखला.
    • मागिल तीन वर्षातील उलाढालीची माहिती.

     वर
     
© Zilla Parishad Sindhudurg - 2009 - Website Designed & Developed by - Softkey Solutions