|
 |
|
 |
  |
|
|
शिक्षण विभाग (प्राथमिक) |
| |
- सर्व
शिक्षा अभियान - 2008-2009
सर्व शिक्षा अभियान योजनेअंतर्गत, सन 2008-09 या आथिर्क वर्षाकरिता 13 कोटी 94 लाख
95 हजाराची योजना सिंधुदुर्ग जिल्ह्याकरीता मंजूर करण्यात आलेली आहे. परंतु महाराष्ट्र
प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबईचे पत्र क्र.7065 दि.30.12.2008 अन्वये सुधारित 13
कोटी 45 लाख 04 हजारच्या आराखड्याला मंजूरी दिलेली आहे.
या योजनेअंतर्गत माहे मार्च, 09 अखेर 11 कोटी 70 लाख अनुदान या जिल्हा परिषदेला
प्राप्त झाले आहे. सुरूवातीची शिल्लक 52 लाख 68 हजार व तालुक्याकडे शिल्लक रु.44.23
लाख होती. सबब सन 2008-09 या वर्षाकरिता एकूण रु.1455.00 लाख एवढे अनुदान उपलब्ध
झाले आहे. सदर अनुदानापैकी माहे मार्च, 2009 अखेर रक्कम रु. 1288.81 लाख एवढा निधी
खर्च झालेला आहे. खर्चाची टक्केवारी 95.81% एवढी आहे.
उपक्रमनिहाय
खर्चाचा तपशिल खालीलप्रमाणे आहे -
- गटसाधन
केंद्र : गटस्तरावर सादिल (रु.20000/-), सभा-प्रवासभत्ता
(रु.9000/-)व शैक्षणिक साहित्य निमिर्ती (रु.5000/-)
निकषानुसार 8 तालुक्यांना प्रत्येकी रक्कम
रु.34000/- प्रमाणे रक्कम रु.2.72 लाख अनूदान मंजूर केले असून सदर अनुदान
गट स्तरावर वितरीत करण्यात आले आहे. तसेच 160 साधन व्यक्तीचीं
नियुक्ती व त्यांच्या वेतन
व भत्त्यावर रक्कम रु.80 लाख एवढी तरतुद मंजूर करण्यात आलेली आहे. आतापर्यंत
139 विषय्ातज्ज्ञांची
नेमणूक केलेली आहे. आतापर्यंत गटसाधन केंद्र या उपक्रमावर एकूण रु.82.72
लाख
खर्च झालेला आहे.
- समूह
साधन केंद्र : समूह
साधन केंद्राकरीता सादिल (रु.3000/-), सभा-प्रवासभत्ता
(रु.3600/-) व शैक्षणिक साहित्य (रु.1000/-) या निकषानुसार प्रत्येकी
रक्कम रु. 7600/- प्रमाणे 144 केंद्राना रक्कम
रु.10.94 लाख एवढे अनुदान मंजूर करण्यात
आलेले
आहे. आतापर्यंत 144 समूह साधन केंद्रांना रु.10.94 लाख अनुदान वितरीत
करण्यात आलेले आहे. सन 2008-09 मध्ये 100%
साध्य करण्यात आलेले आहे.
- शिक्षक अनुदान : या
उपक्रमांतर्गत रक्कम रुपये 27.87 लाख एवढी तरतूद 5573 शिक्षकांना
प्रति शिक्षक रु.500/- प्रमाणे शैक्षणिक साहित्य निमिर्ती करीता
मंजूर करण्यात
आलेली आहे. निकषानुसार जि.प. शाळा, अनुदानित खाजगी व माध्यमिक विद्यालयातील
8 वी पर्यंतच्या
5573 शिक्षकांना रु.27.87 लाख एवढा निधी वितरीत करण्यात आला आहे.
- शाळा अनुदान : या
उपक्रमांतर्गत रक्कम रुपये 119.08 लाख एवढी तरतुद 2128 शाळांना
मंजूर असून या उपक्रमाअंतर्गत 4% सादिलप्रमाणे प्रत्येक शाळेला
आवश्यक
सादिल खर्च
करण्याकरीता प्रती प्राथमिक शाळांना रक्कम रु.5000/- प्रमाणे
व उच्च प्राथमिक शाळांना रु.7000/- प्रमाणे अनुदान देण्यात
येते.
या उपक्रमांतर्गत
1ली ते 7
वी पर्यंतची
शाळा असल्यास दोन स्वतंत्र शाळा समजण्यात येतात. व या निकषानुसार
2112 शाळांना एकूण रक्कम रु.118.46 लाख अनुदानाचे वितरण करण्यात
आलेले आहे.
- अपंग समावेशित शिक्षण : या
योजनेअंतर्गत रक्कम रु.37.37 लाख एवढा निधी प्रति विद्यार्थी
रु.1000/- या प्रमाणे 3737 विद्यार्थ्यांना मंजूर करण्यात आलेला
आहे. सदर कार्यक्रम राबविण्याकरिता जिल्हास्तरावर 3 समन्वयक
व तालुकास्तरावर
8 समन्वयक
यांची नेमणूक केलेली आहे. तसेच जे अपंग विद्यार्थी शाळेत येऊ
शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता 48 फिरस्ती
विशेष शिक्षक
मंजूर केलेले आहेत.
48 फिरस्ती विश्ोष
शिक्षकांपैकी 5 फिरस्ती विशेष शिक्षकांची नेमणूक केलेली आहे.
तसेच 3 वाचा उपचार तज्ज्ञ यांची
नेमणूक केलेली आहे. अपंग विद्यार्थ्यांना साधन साहित्य पुरविणे,
अपंगत्व प्रमाणपत्र देणे तसेच शस्त्रक्रिया करणे, अडथळा विरहित
वातावरण निर्मिती
करणे, मदतनीस भत्ता
इ. लाभ देणेत येतो. यासाठी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर तपासणी
शिबीरे आयोजित केली जातात. सन 2008-09 मध्ये आतापर्यंत 894
विदयार्थ्याना लाभ देण्यात आलेला
आहे. व खर्च रक्कम रू.37.37 लाख एवढा खर्च झालेला आहे.
- मोफत पाठ्यपुस्तके : या
उपक्रमांतर्गत रक्कम रुपये 187.32 लाख एवढी तरतुद मंजूर असून
इ.1 ली ते 8 वी मधील जि. प., अनु. खाजगी व हायस्कूल मधील
सर्व विद्याथिर्नी
व अनु. जाती-जमातीच्या विद्यार्थांना तसेच उर्वरित सर्व मुलांना
या योजनेमधून
लाभ देण्यात आला आहे. सदरील मोफत पाठयपुस्तकांची वाहतुक करण्याकरिता
रक्कम रु.6.26 लाख
एवढा खर्च करण्यात आलेला आहे. तसेच सन 2008-09 मध्ये पुरवठा
केल्ोल्या पाठ्यपुस्तकांची व सन 2009-10 साठीची अॅडव्हान्स
रक्कम रु. 181.05
लाख पाठ्यपुस्तक मंडळाला देण्यात
आलेली आहे. मार्च 09 अखेर एकूण खर्च रु.187.31 लाख करण्यात
आलेला आहे.
- व्यवस्थापन खर्च : या
उपक्रमांतर्गत रक्कम रुपये 68 लाख एवढी तरतुद मंजूर असून
यापैकी रु.50.00 लाख एवढी तरतूद ही सर्व अभियानाअंतर्गत
नियुक्त कमर्चारी
यांचे
वेतन व भत्ते, परिश्रमिक, मानधन व प्रवासभत्ता त्याचप्रमाणे
कार्यालयीन सादिल/साहित्य खर्च केला जातो. उर्वरित रक्कम
रु.18.00 लाखाची
तरतूद ही अध्ययन समृद्धी कार्यक्रम
(LEP) साठी करण्यात आलेली आहे. या मधून 33 शाळांमध्ये वाचन
कोपरा निर्मिती, 52 शाळा गणित अध्यापन, 84 शाळा इंग्रजी
अध्यापन व 23
नंदादीप
शाळा यासाठी करण्यात
आलेली
आहे. आतापर्यंत या उपक्रमांतर्गत रक्कम रु.68.00 लाख एवढा
खर्च करण्यात आलेला आहे.
- नागरी बांधकाम : नागरी
बांधकामे या उपलेखाशिर्षाखाली 107 वर्गखेाल्या, 1700
मीटर संरक्षक भिंत, 12 स्वच्छता गृह, 7 नवीन प्राथमिक शाळा,
6 शाळांना पाणीपुरवठा
सुविधा,
27 शाळांना मोठी दुरुस्ती, 8 दुग्र्ाम भागातील बांधकामांना
अतिरिक्त रक्कम व
मागील अपूर्ण बांधकामांना (Spill over) रक्कम अशी एकूण
तरतूद रु.441.33 लाख एवढी मंजूर
करण्यात आलेली आहे. दिनांक 28/07/2008 रोजी झालेल्या
बांधकाम
उपसमितीच्या सभेत 107 वर्गखोल्यांना प्रशासकीय मंजूरी
घेण्यात आलेली आहे. बांधकाम
संदर्भातील
करारनामे पूर्ण झालेनंतर 75% निधी ग्राम शिक्षण समितीच्या
खाती वर्ग केला जातो. आतापर्यंत
107 वर्गखोल्यांना रु.299.85 लाख, 1700 मीटर संरक्षक
भिंत रु.42.30 लाख, 27 शाळांना मोठी दुरुस्ती करिता रु.25.38
लाख, नवीन प्राथमिक
शाळा रु.38.46 लाख,
12 शाळांना
स्वच्छतागृह रु.4.80 लाख व 6 शाळांना पाणीपुरवठा रक्कम
रु.2.40 लाख एकूण रक्कम रु.413.19
लाख एवढी रक्कम संबंधित ग्रामशिक्षण समितीच्या खाती वर्ग
करण्यात आलेली आहे.
- शाळा देखभाल दुरुस्ती : या
उपक्रमांतर्गत रक्कम रुपये 139.80 लाख एवढी तरतुद 1864
शाळांना मंजूर असून प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मालकीच्या
3 पर्यंत
वर्गखोल्या असणाऱ्या प्राथ. / उ. प्राथ. शाळेस रक्कम
रु.5000/- व 3 पेक्षा
जास्त
वर्गखोल्या असणाऱ्या प्राथ./उ.पाथ. शाळेस रू.10000/-
प्रमाणे 1839 शाळांना रक्कम रु.118.90
लाख अनुदान वितरीत करण्यात आलेले आहे. शाळा अनुदान
प्रमाणेच 1 ली ते 7 वी पर्यंतची शाळा अस्ाल्यास दोन स्वतंत्र
शाळा
समजण्यात येत
आहे.
- पर्यायी शिक्षण व्यवस्था : या
उपक्रमांतर्गत रक्कम रुपये 8.85 लाख एवढी तरतुद मंजूर
असून 10 नाविन्यपूर्ण पर्यायी शिक्षण केंद्र, राजीव
गांधी संधी
शाळा याकरीता
मानधन, सादिल व पाठ्यपुस्तक अनुदान वितरीत करण्यात
आलेले आहे. आतापर्यंत स्वयंसेवकांच्या मानधनापोटी
व जिल्हास्तरावरील
पर्यायी
शिक्षण समन्वयक
यांच्या वेतनावर एकूण
रु7.97 लाख एवढा खर्च करण्यात आलेला आहे.
- शिक्षक प्रशिक्षण : या
उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील 5591 शिक्षकांच्या प्रशिक्षणांकरीता
रक्कम रुपये 86.75 लाख एवढी तरतुद मंजूर करण्यात
आलेली आहे. SCERT, पूणे
यांच्या
नियोजनानुसार शिक्षक प्रशिक्षणावर आतापर्यंत रक्कम
रु86.74 लाख अनुदान खर्च झाले आहे. व जिल्ह्यातील
5591 शिक्षकांना
प्रशिक्षित करण्यात
आलेले आहे.
- नवोपक्रम : नवोपक्रम
या उपक्रमांतर्गत रक्कम रु.100.00 लाख एवढी तरतूद
मंजूर करण्यात आली आहे. सदरील तरतुदीतून बालशिक्षण
संगोपन
या उपक्रमांतर्गत
रु.5.00 लाख एवढी तरतूद आहे. या तरतूदीतून बालोद्यान
निर्मिती करण्यात आली
आहे. बालवाडी ताईंचे
प्रशिक्षण इ. कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
मुलींचे शिक्षण तरतूद
रु.15.00 लाख व अनुसुचित जाती/जमातींचे शिक्षण
तरतूद रु.15.00 लाख यातून िजल्ह्यातील
सर्व समूह
साधन केंद्रे व निवडक 105 उच्च प्राथमिक शाळांमध्ये
पुरक वाचनासाठी वाचनालयाची निर्मितीसाठी आवश्यक
असलेल्या पुस्तकांची
व स्टील
बुक केसची खेरदी केली आहे.
संगणक शिक्षण तरतूद
रु.49.00लाख एवढा खर्च हा म.प्रा.शि.प., मुंबई
स्तरावरुन झाला आहे. अंल्पसंख्यांक मुलांचे शिक्षण
तरतूद रु.15.00
लाख असून
या अंतर्गत
अंल्पसंख्यांक मुलांसाठी
शिष्यवृत्ती परतावा फी, उच्च प्राथमिक उर्दू
शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, उर्दू माध्यमांच्या
शाळेतील विद्यार्थींनीना दप्तर खरेदी अनुदान,
लेखन
साहित्य, गणित पेटी, विज्ञान पेटी, खेळाचे साहित्य
इ.साठी अनुदान
वितरीत करणे,
मार्च 2009 अखेर नाविन्यप्ाूर्ण
या उपक्रमांवर रु.98.97 लाख एवढा खर्च झालेला
आहे.
- सनियंत्रण
व मुल्यमापन :
या उपक्रमांतर्गत 2128 शाळांसाठी रक्कम रु.26.93
लाख एवढी तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. सदर
तरतूदीपैकी रु.9.55
लाख एवढा
खर्च हा जिल्हास्तरावरुन
करावयाचा आहे. उर्वरित निधी रु.17.38 लाख म.प्रा.शि.प.,
मुंबई स्तरावरुन झाला आहे. जिल्हा स्तरावरुन
वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक 2009-10
छपाई, गुणवत्ता
सनियंत्रण
प्रपत्र छपाई, अभ्यास प्रकल्प, साधन गट अनुदान
वितरण इ. खर्च
करणेत आला आहे. मार्च 2009 अखेर या उपक्रमांवर
रु.22.49 लाख एवढा खर्च
करण्यात
आलेला आहे.
- लोकप्रतिनिधी
प्रशिक्षण : लोकप्रतिनिधी
प्रशिक्षणाकरिता रक्कम रु.3.86 लाख एवढा निधी
उपलब्ध करण्यात आलेला आहे यासंदर्भात लोकप्रतिनिधींचे
तालुकास्तरीय व केंद्रस्तरीय
प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्याकरिता
रु.3.85 लाख एवढा खर्च झालेला आहे.
- शिक्षण प्रशिक्षण
साहित्य : 7
वस्तीशाळांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये
रुपातर करण्यात आलेले असून सदर प्राथमिक
शाळांना रु.20000/-
या प्रमाणे अध्ययन
अध्यापन साहित्य (TLE) खरेदी करिता रु.1.40
लाख तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे.
सदर रक्कम
संबंधित शाळांच्या ग्रामशिक्षण समितीच्या
खाती वर्ग करण्यात आलेली आहे.
- शिक्षक पगार
: 7
वस्तीशाळांचे जिल्हा परिषद प्राथमिक
शाळांमध्ये रुपातर करण्यात आलेले असून सदर शाळेवर
काम करणाऱ्या प्रत्येकी
2 शिक्षकांना
(1 शिक्षक
व 1 निम्म
शिक्षक) पगार तरतूद रक्कम रु.2.84 लाख
करणेत आलेली आहे. मार्च 2009 अखेर या
उपक्रमांवर रु.2.61 लाख
एवढा खर्च
झालेला आहे.
|
|
- प्राथ
शाळा क्रीडा स्पर्धा (जि.प.स्वउत्पन्नतून सदरची योजना)
प्राथ शाळा क्रीडा स्पर्धा ही जि.प.स्वउत्पन्नतून सदरची योजना
राबविली जाते. सदरची योजना 1998.99 पासुन सुरु करणेत आलेली
आहे.
सदर
योजनेची अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.
- शालेय
विदयार्थ्यांच्या सुप्त क्रीडा, कला, अभिनय व बोदधीक क्षमतेला
संधी देणेसाठी व त्याचा विकास होणच्या दृष्टीने व त्यांचे
गुणांचे कौतूक
व प्रौत्साहन देणे या हेतूने सदरची योजना शिक्षण
विभागातर्फे सुरु करणेत आली.
- सदरची योजना जि.प.प्रशासन,पालक,समाज
व सामाजिक बांधिलकीने काम करणारे लोक यांचे सहकार्यातून
यशस्विरीत्या पार
पाडली जाते.
- सदरची योजना केंद्र स्तर,प्रभाग स्तर,तालूका
स्तर व जिल्हा स्तर अशा प्रकारे आयाजित केली जाते.
- स्पर्धेत
यशस्वी विदयार्थ्यांचा प्रमाणपत्र व शिल्ड देवून गौरव
केला जातो. तसेच
सर्व गटांतून सर्वसाधारण विजेता व उपविजेता
अशी पारीतोषीके
दिवून स्पर्धकांचा
व गटांचा गौरव केला जातो.
|
|
- शालेय
पोषण आहार योजना अन्न शिजवून देणे (इयत्ता 1 ली ते 5 वी)
म.शासन शा. शि. विभागा कडील दिनांक 16 मे 2002 चे शा नि. या
योजने अंतर्गत 2002-2003 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 1 ली
ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना शिजवून अन्न देणे.
सदरची योजना जि.प.प्राथमिक शाळा, अनुदानित खा.प.शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा, वस्तीशाळा,महात्मा
फुले शिक्षण हमी शाळांमधील इयत्ता 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना लागू करणे,
प्रति विद्यार्थी प्रती दिनं 100 ग्रॅम प्रमाणे एकूण उपस्थितीच्या प्रमाणात दरमहा
तांदुळ शिजवून दिला जातो. तसेच प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करणे, तसेच विद्यार्थ्यांच्या
पटनोंदणीचे व उपस्थितीचे प्रमाण वाढविणे, गळतीचे प्रमाण कमी करणे, विद्यार्थ्यांचे
आरोग्य सुधारणे. यासाठी योजना राबविली जाते. तसेच प्रतिदिन प्रति विद्यार्थी केंद्र/राज्य
हिस्सा र.रु. 2.08 प्रमाणे अन्न शिजवून देणेसाठी मानधनावर खर्च केला जातो.
|
|
- राष्ट्रीय
शालेय मध्यान्ह भोजन योजना (इयत्ता 6 वी ते 8 वी)
म.शा. शा. शि. विभागा कडील शासन निर्णय दिनांक 8 ऑगस्ट 2008
चे शासन निर्णयान्वये राष्ट्रीय शालेय मध्यान्ह भोजन कार्यक्रम
ही केंद्र पुरस्कृत योजना इ. 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांसाठी
सर्व तालुक्यां मध्ये सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे.
सदरची योजना इयत्ता 1 ली ते 5 वी च्या शालेय पोषण आहार योजनेच्या
प्रचलीत पध्दतीप्रमाणे , ज्या प्राथमिक शाळांना इ. 6 वी ,7
वी चे वर्ग जोडले आहेत त्या वर्गातील लाभार्थ्यांना सध्याच्या
कार्यपध्दतीप्रमाणे पोषण आहार देवून योजना राबविणे, त्याचप्रमाणे
माध्यमिक शाळांतील इ. 6वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना विहित
केलेला पोषण आहार वाटप स्वंतत्रपणे उपाययोजना करुन योजना
राबविणे.
प्रति विद्यार्थी प्रती दिनं 150 ग्रॅम प्रमाणे एकूण उपस्थितीच्या प्रमाणात दरमहा
तांदुळ शिजवून दिला जातो. तसेच प्रतिदिन प्रति विद्यार्थी केंद्र/राज्य हिस्सा र.रु.
2.60 प्रमाणे अन्न शिजवून देणेसाठी मानधनावर खर्च केला जातो.
|
|
| मा.शिक्षण संचालक, महा. .रा.पुणे यांजकडील दिनांक 6.12.1979 चे परिपत्र कान्वये
ग्रामिण भागातील प्राथमिक शाळांना आदर्श शाळाना पुरस्कार देणेबाबत
आदेश आहेत.
गटशिक्षणाधिकारी यांचेकडून व्दिशिक्षकी शाळा- व बहुशिक्षकी शाळांचे प्रस्ताव मागवून,
विस्तार अधिकारी (शि.) यांचेकडे सदरचे प्रस्ताव प्रत्यक्ष शाळांना भेटी देवून प्रस्तावाची
छाननी करुन गुणांकन करणे, वि.अ.यांचेकडून प्रस्तांवाचे गुणांकन झाल्यावर सदरचा अहवाल
निवड समिती पुढे ठेवून निवड समितीचे बैठकीमध्ये बहुशिक्षकी/व्दिशिक्षकी शाळांची
निवड करणे.
निवड झालेल्या शाळांना बहुशिक्षकी शाळांसाठी रु. 200/- प्रत्येकी व व्दिशिक्षकी
शाळांसाठी रु. 100/- प्रत्येकी या प्रमाणे पारितोषिक देण्यात येते.
|
|
- मुलींची
उत्कृष्ट पटनोंदणी अंतर्गत प्राथमिक शिक्षक व वि.अ.शि यांना
प्रोत्साहनपरपारितोषिक योजना
म. शा.कडील शा.नि. दिनांक 13 जून 1984 अन्वये मुलींच्या उत्कृष्ट
पटनोंदणी साठी प्राथमिक शिक्षक व वि.अ.शि यांना प्रोत्साहनपर पारितोषिक
योजना राबविणेसाठी मान्यता दिलेली आहे.
गटशिक्षणाधिकारी यांचेकडून व्दिशिक्षकी शाळा- व बहुशिक्षकी शाळांचे प्रस्ताव मागवून,
प्रस्तावाची छाननी करुन सदरचा अहवाल निवड समिती पुढे ठेवून, ज्या शाळांतील शिक्षकांचे
मुलींच्या पटनोंदणीचे काम उत्कृष्ट झालेले आहे अशा बहुशिक्षकी/ व्दिशिक्षकी शाळांमधील
शिक्षकांची मुलींच्या उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कारासाठी निवड समितीचे बैठकीमध्ये
निवड करणे, तसेच ज्या वि.अ.शिक्षण यांच्या प्रभागातील शिक्षकांना जास्त पारितोषिके
मिळाली आहेत अशा वि.अ.ची वि.अ. पारितोषिकाची निवड करणे.
निवड झालेल्या शिक्षक व वि.अ. यांना प्रत्येकी रु. 100/- या प्रमाणे पारितोषिक देण्यात
येवून, उर्वरित रक्कम सादिल खर्चासाठी खर्च केली जाते.
|
|
|
राज्यामध्ये बालभवन केंद्रे उघडण्याची योजना सन 74-75
मध्ये सुरु करणेत आली . सदर योजना मुलांच्या सर्वांगीण
विकासासाठी असून प्रतिवर्षी रु 5000/- अनुदान दिले
जाते. 9 ते 14 वयोगटातील मुलांच्या सर्वांगिण विकासास
चालना देण्यासाठी शाळेच्या व्यतिरिक्तच्या वेळात बालकांना
रंजनात्मक व शारीरिक हालचाली अंतर्भुत असणारे विविध
कार्यक्रम व संविधा बाल भवन केंद्रात उपलब्ध करून
दिल्या जातात. सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये कुडाळ तालुक्यातील
माणगांव येथे हे केंद्र आहे.
|
|
|
शासनाने 3-1-92 या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी सुरु करण्यात
आलेली आहे.
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याबाबतचे धोरणानुसार प्राथमिक शाळेत जाणा-या
मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठीचे इयत्ता
1 ली ते 4 मधील शाळेत जाणा-या अनुसुचित जाती ,भटक्या जाती व विमुक्त जमातीतील दारिद्रय
रेषेतील विद्यार्थींनीना नियमित शाळेत उपस्थित राहण्यासाठी प्रतिदिन प्रत्येक मुलीमागे
1 रु. या दाराने रक्कम रु.220/- च्या मर्यादेत देवुन योजना राबविली जाते.
शाळेत जाणा-या मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्या
साठी प्रतिदिन 1रु. प्रमाणे वार्षिक र.रु.220/-प्रमाणे अनुदान वितरीत केले जाते.
|
|
- सावित्रिबाई
फुले दत्तक पालक योजना
सन 1993-94 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक व शैक्षणिक सुधारणासाठी
बांधिलकी स्विकारुन स्वखर्चाने मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन
देण्याच्या दृष्टीने सेवाभावी पालकांच्या मार्फत सावित्रिबाई फुले
दत्तक पालक योजना सुरु केलेली आहे. गरजु व होतकरु मुलींना शिक्षणासाठी
हातभार लावण्याची मोठया प्रमाणात चळवळ उभी करण्याचे दृष्टीने सुरु
केलेली आहे. प्रति विद्यार्थीनी रक्कम रु.3,000/- देणगी स्विकारली
जाते. त्या देणगीमधुन मासिक रु.30/- किंवा वार्षिक रु.360/- विद्यार्थींनीना
ग्रामशिक्षण समितीमार्फत दिले जाते. सदरची योजना 1993-94 पासुन
सुरु करण्यात आलेली आहे.
सामाजिक व शैक्षणिक सुधारणासाठी बांधिलकी स्विकारुन स्वखर्चाने
मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने देणगी रु.3000/-
स्विकारले जातील.
|
|
|
अनुसुचित जाती,जमाती, भटक्या जमाती व विमुक्त जातीच्या इयत्ता
1 ली ते 4 थीच्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांची
गळती रोखुन उपस्थिती वाढविण्याच्या दृष्टिने शासनाने 1976-80
या शैक्षणिक वर्षापासून या मागासवर्गीय संवर्गातील विद्याथर्यांना
गणवेश व लेखन साहित्य मोफत पूरविण्याची योजना सुरु केली आहे.
सन 2004.05 पासून सदर योजनेची अंमलबजावणी ग्रामशिक्षण समिती मार्फत
सुरु केलेली असुन जिल्हास्तरावरुन गणवेशचा कमालदर मुलांसाठी (शर्ट
व पँट) र.रू.57 - 21/- व मुलींसाठी (स्कर्ट व ब्लाउज) र.रू.69
- 75/- तसेच लेखन साहित्यासाठी 20% रक्कम वितरीत केली जाते. सदरची
योजना 1993-94 पासुन सुरु करण्यात आलेली आहे.
त्याच्या अटी व
शर्ती खालीलप्रमाणे आहे.
- विद्यार्थी
व विद्यार्थींनी ही दारीद्रय रेषेखालील असावी.
- विद्यार्थी
व विद्यार्थींनी ही जि.प.च्या प्राथमिक शाळेत शिक्षण घेणारी
असावी.
या योजनेचे उददेश सफल झालेला असुन विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण
वाढलेले असे आढळलेले आहे.
|
|
- पूर्व
माध्यमिक शिक्षकांना परितोषिक योजना
सदरची योजना 1962-63 पासुन सुरु करणेत आलेली आहे. सदर योजनेची अटी
व शर्ती खालील प्रमाणे आहेत.
- सदरचे प्रस्ताव ग.शि.अ. यांचेमार्फत
मा.सभापती पं.स. व ग.वि.अ. यांचे संमतीने येणे
आवश्यक आहे.
- जिल्हयातील प्रत्येक तालुक्यामधून एक प्राथमिक शिंक्षकाची निवड केली
जाते.
- सदरचा पुरस्कार 5 सप्टैंबर या शिक्षक दिनी वितरीत
करावा.
- सदर शिक्षकाची निवड जिल्हास्तरीय निवड समिती मार्फत
केली जाते.
|
|
- माध्यमिक/पूर्व
माध्यमिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना
सदरची योजना 1989-90 पासुन सुरु करणेत आलेली आहे. सदर योजनेची
अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.
- जिल्हयातील
जि.प.प्राथ. शाळांची उपस्थिती टिकविणे हा या योजनेचा मुळ
उद्देश.
- विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता स्पर्धेत सहभागी
होण्यास उत्तेजित.
- विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक
शैक्षणिक बाबींचा सराव.
|
|
|
सदरची योजना 2002.03 पासुन सुरु करणेत आलेली आहे. सदर योजनेची
अटी व शर्ती खालील प्रमाणे आहेत.
- जिल्हास्तरीत
बाल कला क्रिडा स्पर्धेतील वैयक्तिक गटातील प्रथम क्रमांकाच्या
विद्यार्थ्यांना रु.100/- दरमहा व व द्वितीय क्रमांकांच्या
विद्यार्थ्यांना रु.75
/- दरमहा याप्रमाणे 12 महिन्याची शिष्यवृत्ती आदा केली
जाते.
|
|
| |
|
 |
 |
 |
|
|