|
 |
|
 |
  |
| जिल्हा परिषद,
सिंधुदुर्ग |
| |
|
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे
दालन |
|
|
मा. अध्यक्ष यांचे दालन |
|
|
ऍन्टी चेंबर |
|
| |
- महाराष्ट्र
शासनाने 1 में 1962 रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत
समित्या अधिनियम
1961 चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषदा, गट
पातळीवर पंचायत समिती व गांव पातळीवर ग्राम पंचायत अशा रितीने
पंचायत राजची
स्थापना केली.
- 1 में. 1981 साली जिल्हा परिषदची स्थापना झाली. जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष
होण्याचा मान श्री. आर.बी.दळवी यांना मिळाला. त्यांनी 19/04/1992 ते 20/12/1995
पर्यंत अध्यक्ष पद भुषविले. तेव्हापासून आज अखेर 17 अध्यक्ष झाले. सध्या मा. श्रीमती रेखा अंकुश कदम अध्यक्षपद भुषवत आहेत.
- आज रोजी 08 पंचायत समिती अणि 430 ग्राम पंचायती ग्रामिण भांगांच्या विकासासाठी
कार्यरत आहेत. शासनाचे कोणतेही नवीन योजना, अभियान, मोहिम, राबविण्यात सिंधुदुर्ग
जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहीलेली आहे.
- सन 2008 साली सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आय.एस.ओ. 9001:2000 प्रमाणित झालेली
आहे.
- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत मालवण गटातील आंबडोस ग्रा.पं.
सा 2005-06 मध्ये राज्यस्तरावर स्तरावर प्रथम क्रमांक विजेती ठरलेली
आहे.
- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत सन 2006-07 मध्ये
जिल्हा स्तरावर सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी अंतर्गत
कातवण ता.देवगड या
अंगणवाडीला तसेच
सानेगुरूजी स्वच्छ शाळा अंतर्गत कातवण ता.देवगड या शाळेस प्रथम
क्रमांक प्राप्त झालेले आहेत.
- यशवंत पंचायत राज अभियान सन 2006-07 (सा 2005-06 च्या कामगिरीवर
आधारीत ) जिल्हा स्तरावर महाराष्ट्र राज्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा
परिषद तृतीय
क्र मांक मानकरी
ठरलेली असून र.रु. 2.00 लाखाचे पारितोषिक मिळालेले आहे.
- कोकण विभागात यशवंत पंचायत राज अभियान सन 2006-07 (सा 2005-06
च्या कामगिरीवर आधारीत ) विभाग स्तरावर मालवण तालुक्यातील साळेल
ग्राम पंचायतीस
तृतीय क्रमांकाचा
बहूमान प्राप्त झाला असून र.रु. 0.30 लाख पारीतोषिक मिळालेले
आहे.
- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या 1 मे 1981 हया स्थापन दिनाच्या
25 व्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कर्मचारी वर्गाची
कार्यक्षमता
व अंगभूत कलागुणांना
उत्तेजन
मिळणेस्तव जिल्हा परिषदेमधील कार्यरत कर्मचाऱ्यांची 10 वर्षाची
सेवा, मागील 5 वर्षाचे गोपनीय अहवाल व विशेष कामगिरी विचारात
घेऊन जि.प.अनुदानातून
दि.1
मे 2006 रोजी जिल्हयाचे
पालकमंत्री मा.ना.नारायण रावजी राणे यांचे हस्ते प्रमाणपत्र
स्मृतीचिन्ह देवून वर्ग-3 व वर्ग-4 च्या एकूण 101 अधिकारी
/ कर्मचार्यांचा
गौरव करणेत आला.
|
| |
|
 |
 |
 |
|
|